LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

बोध चिन्हाविनाच अपक्ष उमेदवार लागले प्रचाराला

चिन्हांची प्रतीक्षा : 26 नोहेंबरला होणार वाटप

राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाच्या उमेदवारांना मिळणार अधिकृत चिन्ह

गोंदिया : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या पक्षाच्या उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला आहे. अपक्ष उमेदवारांना चिन्हाचे वाटप २६ नोव्हेंबर रोजी होणार असले तरी त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. अशा प्रकारे अपक्ष उमेदवारही प्रचार कामाला लागले आहेत.जिल्ह्यात होत असलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतच्या निवडणूकीसाठी अध्यक्ष व सदस्य पदासाठी अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील काही जणांनी अर्ज मागे घेतल्यानंतर जे उमेदवार रिंगणात आहेत. अशा पक्षाच्या उमेदवारांना एबी फॉर्म सोबतच त्यांचे पक्षाचे चिन्ह आपोआप मिळत असते. मात्रअपक्ष उमेदवारांना जोपर्यंत चिन्हाचे वाटप होत नाही तोपर्यंत चिन्हासहित प्रचार करणे शक्य नसते. निवडणूक विभागाकडून अधिकृत चिन्ह मिळाल्यानंतर प्रचारासाठी फार कमी वेळ असल्याने तेवढा वेळ वाया न घालता अपक्ष उमेदवारांनीही आपला प्रचार सुरू केला आहे. २६ नोव्हेंबर रोजी दुपारपर्यंत चिन्हांचे वाटप होणार आहे. त्यानंतर जाहीरप्रचार करता येऊ शकतो. त्यामुळे प्रचाराला केवळ चार ते पाच दिवस मिळत असल्याने एवढ्या कमी वेळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पक्षाच्या पोहोचणे कठीण असल्यामुळे अपक्ष उमेदवारांनीही आपल्या प्रचार कार्याला सुरुवात केली आहे. राष्ट्रीयकृत उमेदवारांना एबी फॉर्म सोबतच त्यांची चिन्हे मिळत असतात. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, बहुजन समाज पार्टी भारतीय कम्युनिस्ट पार्टी व आम आदमी हे राष्ट्रीयकृत पक्ष आहेत. त्यामुळे ज्या उमेदवारांनी या पक्षाचा एबी फॉर्म दाखल केला. त्या उमेदवारांना त्या पक्षाचे चिन्ह आपोआप मिळतात. तर प्रादेशिक पक्षांना निवडणूक आयोगाकडून मिळालेले चिन्ह त्यांच्या उमेदवारांना मिळतात. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उबाठा या पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी या पक्षाचे एबी फॉर्म जोडले आहेत त्या उमेदवारांना निवडणूक आयोगाने दिलेले चिन्ह आपोआपच मिळते. यानंतर नोंदणीकृत पक्षांना चिन्ह वाटपाच्या वेळेस प्राधान्य दिल्या जाते. जे पक्ष नोंदणीकृत आहेत मात्र त्यांना निवडणूक आयोगाकडून चिन्ह मिळाले नाही अशा पक्षाच्या उमेदवारांना चिन्ह वाटपाच्या वेळेस पहिले प्राधान्य दिले जाते. एकच चिन्ह दोन उमेदवारांनी मागितले तर अशा वेळेस ईश्वरचिठ्ठीने चिन्हाचे वाटप केल्या जाते. वाशिम जिल्ह्यात असलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीमधील उमेदवारांना २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पासून चिन्हाचे वाटप करण्यास सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत पार पडण्याची शक्यता आहे. म्हणजे २६ नोव्हेंबर पासून अपक्ष उमेदवारांनाही आपल्या चिन्हा सहित प्रचार करता येणार आहे मात्र त्यानंतर कमी वेळ असल्याने रिंगणातील बऱ्याच अपक्ष उमेदवारांनीही प्रचार कार्याला आतापासूनच सुरुवात केली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *