बालकांचे कायदेविषयक एक दिवशीय कार्यशाळा उत्साहात संपन्न
भंडारा : महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था पुणे तसेच महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था यांचे संयुक्त विद्यमाने भंडारा तालुक्यातील शालेय स्तरावरील मुख्याध्यापक, गाव बाल संरक्षण समितीचे सदस्य सचिव अंगणवाडी सेविका यांची 05 ऑगस्ट,2025 रोजी बालकाचे कायदेविषयक एक दिवशीय कार्यशाळा पोलीस बहुउद्देशिय सभागृह भंडारा येथे संपन्न झाली. या कार्यशाळेला उद्घाटक म्हणुन मिलींद बुराडे (सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा),यांनी विधी सेवा प्राधिकरण म्हणजे काय ? तसेच PCPNDT Act याविषयी मार्गदर्शन केले तर प्रमुख अतिथी म्हणुन लाभलेले नितीन मोहुर्ले (बाल विकास प्रकल्प अधिकारी,(शहरी), यांनी गाव बाल संरक्षण समितीची भुमिका काय याविषयी मागर्दर्शन केले , श्रीमती सानिका वडनेरकर अध्यक्षा, बाल कल्याण समिती, भंडारा यांनी POCSO Act व बाल कल्याण समिती याविषयी मार्गदर्शन केले, POSH Act, अंतर्गत तक्रार निवारण समिती याविषयी सखोल मार्गदर्शन श्रीमती अमिता खोब्रगडे (विधी सल्लागार) यांनी मार्गदर्शन केले तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, नितीनकुमार साठवणे यांनी चर्चा सत्राच्या माध्यमातुन सर्वाना समजेल अशा सोप्या भाषेत बालकांचे कायदेविषयक,तंबाखु मुकत शाळा, याविषयी मार्गदर्शन केले, चाईल्ड हेल्पलाईन भंडारा 1098 कायर्रत यंत्रणेविषयी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे प्रास्तावित अरुण धों. बांदुरकर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, भंडारा यांनी केले श्रीमती प्रियंका पशिने कायदा व परीविक्षा अधिकारी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर आधार प्रदर्शन कु. सविता सोनकुसरे यांनी केले. सदरची कार्यशाळा यशस्वी करण्याकरीता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्याल्यातील अधिकारी/ कर्मचारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष,अधिकारी/कर्मचारी,चाईल्ड हेल्पलाईन भंडारा येथील अधिकारी/ कर्मचारी यांनी प्रयत्न केले. बालकाच्या प्रकरणात कोणतीही माहिती असल्यास तत्काळ 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, अरुण बांदुरकर यांनी करण्यात येत आहे.

