डोंगरगाव येथे नेत्र तपासणी शिबीराचा 175 जणांनी घेतला लाभ
गोंदिया : आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र डोंगरगाव व समता फाऊंडेशन महात्मे नेत्र रुग्णालय नागपुर यांचे सहकार्याने डोंगरगाव येथे निशुल्क मोतिबिंदु तपासणी शिबीर दि.15 सप्टेंबर रोजी संपन्न झाले.नेत्र तपासणी शिबीराचे उदघाटन जिल्हा परिषदेचे माजी महिला व बाल विकास सभापती सविताताई पुराम यांचे हस्ते करण्यात आले.या शिबीरामध्ये मोफत डोळे तपासणी व मोतिबिंदु निदान चाचणी करण्यात आली.तपासणी शिबीराप्रसंगी 175 व्यक्तींची नोंदणी करुन 135 व्यक्तींची मोतिबिंदु तपासणी करण्यात आली.डोंगरगाव येथे नेत्र तपासणी शिबीराला ग्रामस्थांनी उत्फुर्त्स प्रतिसाद दिला.यात विविध प्रकारच्या नेत्र समस्यांनी ग्रासलेल्या 135 रुग्णांपैकी 81 मोतिबिंदु रुग्णांना महात्मे नेत्र रुग्णालय नागपुर येथे मोफत शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी संदर्भित करण्यात आले.शिबीराप्रसंगी 123 व्यक्तींची मधुमेह व रक्तदाब तपासणी करण्यात आली. तसेच ईतर महत्वाचे 36 रुग्णांचे आवश्यक प्रयोगशाळा तपासणी सुद्धा करण्यात आल्याची माहीती आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ.सुजाता ताराम यांनी दिली आहे.आयुष आयुर्वेदेचा प्रचार होण्याच्या दृष्टीकोनातुतुन 54 आयुर्वेद पुस्तिकाचे वितरण करण्यात आले. तसेच 4 व्यक्तिंच्या हस्ते आयुष दवाखाना परिसरात वृक्ष लागवड सुद्धा यावेळी करण्यात आले.मोतिबिंदु तपासणी शिबीरात महात्मे नेत्र रुग्णालय नागपुरचे नेत्ररोग तज्ञ डॉ.दिशा यांनी नेत्र तपासणी केली तर समाजसेवक प्रफुल उकुंडे यांनी समुपदेशन केले. आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र डोंगरगावच्या वतीने आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ.सुजाता ताराम,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.प्रियंका गणवीर,आरोग्य सेविका माधुरी वैद्य,आरोग्य सेवक नागरे व मोरे यांचे सह आशा सेविका व परिचर यांनी रुग्ण सेवा बजावली.

