गोंदियात नशा मुक्तीचा संदेश देण्यासाठी नमो मॅरेथॉनचे दौड चे भव्य आयोजन
दोन हजाराच्या वर स्पर्धकांनी घेतला सहभाग : जिल्हा भारतीय जनता मोर्चा तर्फे आयोजन
गोंदिया : देशातील तरुण पिढीला नशा मुक्तीचा संदेश देण्यासाठी आणी कोणत्याही प्रकारचे व्यसनाचा त्याग करून नशा मुक्त भारत करण्यासाठी गोंदियात आज रविवार २८ सप्टेंबर रोजी भाजपा युवा मोर्च्याच्या वतीने गोंदियातील जयस्तंभ चौक प्रशासकीय ईमारती समोर नमो मॅरेथॉनचे दौड स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार विनोद अग्रवाल, भाजपा गोंदिया जिल्हाध्यक्ष सीताबाई रहांगडाले, माजी नगरसेवक दिनेश दादरीवाल सुनील केलनका, माजी बांधकाम सभापती घनश्याम पानतावणे, धर्मेंद्र डोहरे, अहमद मणियार आदि उपस्थित होते.या मॅरेथॉनचे दौड स्पर्धेत मुलींसाठी तीन किलोमीटर तर मुलांसाठी पाच किलोमीटर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गोंदिया तालुक्यातील तरुण तरुणींनी हिरीरीने मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदविला. पुरुष आणी महिला गटात प्रथम येणाऱ्या पहिल्या पाच स्पर्धेकांना रोख रक्कम आणी म्यॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रोत्साहन पर सहभाग नोंदविण्याचा प्रमाणपत्र आणि बक्षीस देण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्देश नशा मुक्तीचा संदेश देण्यासाठी आणी नशा मुक्त भारत करण्यासाठी करण्यात आले होते. सदर आयोजन हे गोंदिया जिल्हा भाजपा युवा मोर्च्याच्या वतीने नमो म्यॅरेथोन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात दोन हजाराच्या वर तरुण तरुणीनी सहभाग घेतला होता. पुरुष आणी महिला गटात प्रथम येणाऱ्या पहिल्या पाच स्पर्धकांना रोख रक्कम आणी स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते प्रोत्साहन पर पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला . भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ” राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता ” सेवा पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले असून या पंधरवाड्याचे समारोप राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती २ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. या पंधरा दिवसात संपूर्ण राज्यात जिल्हा पातळीवर विविध उपक्रम राबवित नागरिकांना विविध योजनानचा लाभ मिळवून देण्यात येत असून याचाच एक भाग म्हूणन नशा मुक्त भारत करण्यासाठी आणी आजच्या तरुणाईला लागलेला व्यसनाची सवय असून नशा मुक्त करण्यासाठी गोंदियात नमो म्यॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन कारण्यात आले होते. गोंदिया जिल्ह्याच्या गोंदिया, गोरेगाव, आमगाव, देवरी, सालेकसा ,अर्जुनी मोरगाव, तिरोडा आणि सडक अर्जुनी या आठही तालुक्यातील तरुण तरुणी या म्यॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला होता यात मुलींसाठी 3 किलोमीटर तर मुलांसाठी 5 किलोमीटर च्या म्यॅरेथोन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आणि भविष्यात पण गोंदिया जिल्ह्यातील तरुण-तरुणींसाठी अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक गोंदिया जिल्हा भाजपा युवा मोर्च्याचे अध्यक्ष रोहित अग्रवाल यांनी दिली आहे तर अश्या पद्धतीच्या म्यॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन गोंदियात ठिक ठीकाणी करण्यात यावे अशी मागणी या स्पर्धेत सहभाग नोंदविलेल्या तरुणांनी आयोजकांना केली आहे. जेणे करून भविष्यात राज्य पातळीवर होणाऱ्या म्यॅरेथॉन स्पर्धेत देखील गोंदिया जिल्यातील धाव पट्टूना सहभाग घेता येईल. असे वक्तव्य या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारी आरती भगत आणि निखार भेलावे यांनी व्यक्त केले. तर येत्या काळात गोंदिया जिल्यातील धावक देखील राज्य पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या म्यॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊ शकतील या साठी लवकरच सिंथेटिक रनींग ट्रॅक तयार करण्यात येणार आणि गोंदिया जिल्ह्यातून विविध खेळांचे खेळाडू तयार व्हावे असे माझे प्रयत्न राहणार असल्याची माहिती आमदार विनोद अग्रवाल यांनी या प्रसंगी दिली. या मॅरेथॉन स्पर्धा कार्यक्रमाचे संचालन जयंत शुक्ला यांनी केले तर आभार भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष रोहित अग्रवाल यांनी मानले.

