LatestNewsगोंदिया

Majur death : सिमेंट विटा कारखान्यात मजुराचा मृत्यू

देवरी पोलीस स्टेशन हद्दीतील एम.आय.डी.सी. मधील सुफलाम कंपनी परिसरातील घटना.
देवरी :
देवरी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या  देवरी येथील एम.आय.डी.सी.मधील सुफलाम कंपनी परिसरात असलेल्या सिमेंट विटा कारखान्यात शुक्रवार (ता.१२ सप्टेंबर ) रोजी सायंकाळी अंदाजे ४:४५ वाजे दरम्यान सिमेंट विटा बनविणाऱ्या मशीन मध्ये एका मजुराचा होरपळून (Majur death) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतक मजुराचे नाव, रंजीत सदाराम सोनटक्के (वय ३८) रा. पिंडकेपार/गोटाबोडी. ता.देवरी असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,  देवरी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास निगम येथे सुफलाम कंपनी असून, या  परिसरात सिमेंट विटा बनविण्याचा कारखाना स्थापन केला आहे. या कारखान्यात सिमेंट विटा बनविण्याचे काम चालू असते. (Majur death) मृतक रंजित आपल्या कुटुंबात कर्ता व्यक्ती असल्याने, उदरनिर्वाह करण्याकरिता नेहमीप्रमाणे ता. १२ सप्टेंबर २०२५ रोजी सिमेंट विटा कारखान्यात साथीदारासह काम करण्याकरिता गेला होता. दिवसभर कारखान्यात काम केला. अंदाजे ४:४५ वाजे दरम्यान मृतक सिमेंट मिक्सर होणारा हंडा पाण्याने साफ करीत असताना, अपघात घडला. अपघातात मृतक इसम गंभीर जखमी झाला. कारखान्यात असणाऱ्या इतर मजुरांनी आरडाओरड केली.(Majur death) मृतकाला मशीनीबाहेर काढून प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय देवरी येथे भरती केले.  ग्रामीण रुग्णालय देवरी येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचाराकरिता गोंदियाच्या खाजगी रुग्णालय  येथे हलविण्यात आले. हालत गंभीर असल्याने गोंदियावरून नागपूरला उपचाराकरिता नेत असताना, भंडारा जवळ वाटेत प्राणज्योत मालवली.
(Majur death)  मृतकाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय देवरी येथे करण्यात आले. घटनेची माहिती देवरी पोलीस स्टेशन येथे देण्यात आली असून, गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास देवरी पोलीस करीत आहे. लहानपणापासून वडीलाचा डोक्यावर हात नसलेल्या रंजीत याने कोणत्याही परिस्थितीला न डगमगता कोणतेही मजुरीचे कामे करून आई, पत्नी तसेच नऊ महिन्याच्या मुलीला कधीच कुठलाही कमीपणा होऊ दिला नाही. अचानक घडलेल्या घटनेमुळे सोनटक्के कुटुंबीयावर आभार फाटल्यागत परिस्थिती ओढविली आहे. गावातील होतकरू तरुण, कुटुंबाचा आधार गेल्याने पिंडकेपार गाव परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *