दिव्यांग मुलांचे 7 ऑक्टोबर रोजी विशेष शिबिर
भंडारा : उच्च न्यायालयाची बाल न्यायाय समिती आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार उच्ब न्यायालयाची बाल न्याय समिती व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार व तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व त्याच बरोबर दिव्यांगाबाबत कार्य करणान्या सामाजिक सस्थांच्या सयुक्त विद्यमाने भंडारा जिल्हातील ते १८ वर्षाखालील दिव्याग मुलाच्या सक्षमीकरण, सर्वेक्षण, तपासणी विविध योजनांचा लाभ देण्याकरीता विशेष शिबिराचे आयोजन दिनांक ०७/१०/२०२५ रोजी सकाळी १०.१५ पोलीस बहुद्देशिय सभागृह, भडारा येथे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर शिबिरामध्ये दिव्यांग मुलाचे सर्वेक्षण, वैद्यकिय तपासणी करण्यात येणार असून दिव्यांग मुलांना शासनाकडून देण्यात येणा-या साहित्याचे वाटप सुध्दा करण्यात येणार आहे. तसेच, सदर शिबिरात दिव्यांग मुलांना शासनाच्या विविध योजनांशी जोडण्याबाबत नोंदणी करुन पुढे त्या योजना प्रत्येक्षात सदर दिव्यांगाशी जोडण्याबाबत पुढील कार्यवाही होणार आहे. सदर शिबिरात आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, आधार कार्ड युनिक डिसेबिलिटी ओळखपत्र व वैद्यकीय तपासणी अशा विविध प्रकारचे लाभमिळणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग, दिव्यांग विभाग व जिल्यातील दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या शाळा व सर्व अशासकीय संस्था (NGO) यांचेमार्फत दिव्यांग बालकांची ओळख तपासणी करणेकरिता शिबिराच्या नियोजन बाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि. २९/०९/२०२५ रोजी आयोजन केले होते. दिनांक दिव्यांग मुलांच्या सक्षमीकरणाकरीता आयोजित ०७/१०/२०२५ रोजीच्या नियोजित विशेष शिबिरात दिव्यांग मुलांचे सर्वेक्षण, तपासणी व नोंदणी होवून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ, आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, युनिक डिसीबीलीटी ओळखपत्र वितरण तसेच, शासनाकडून दिव्यांग बालकांस द्यावयाचे प्रलंबित असलेले साहित्य व प्रमाणपत्र वाटप होणार आहे. त्या करीता जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील जास्तीत जास्त दिव्यांग मुलांनी सहभाग घ्यावा असे आव्हाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे विभागानी कळविले आहे. सदर शिबिराबाबत अधिक माहिती करीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा तसेच तालुका विधी सेवा समिती, मोहाडी तुमसर, साकोली, लाखणी, पवनी, लाखांदुर तसेच शासनाच्या संबधीत विभागाशी संपर्क साधावा.

