LatestNewsगोंदियाविदर्भ

सुदृढ नारी सशक्त समाजाचा पाया : जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.पटले

‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान १७ पासून
लाभ घेण्याचे आवाहन
गोंदिया :
महिला ही कुटूंबाची प्रमुख असते. कुटूंबाचा सांभाळ, मुलांची देखरेख आणि समाजातील आपली भागिदारी निश्चित करून नेतृत्व करताना अनेक महिला दिसून येत आहेत. त्यामुळे महिलांचे आरोग्य सुदृढ असणे आवश्यक आहे. सशक्त महिला कुंटूबासह समाजाचा पाया असतात. त्यामुळे सशक्त समाज निर्मितीसाठी महिलांचे सुदढ असणे काळाची गरज आहे, यासाठी १७ सप्टेंबरपासून ‘सुदृढ नारी सशक्त परिवार’ या अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या अभियानात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होवून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.पुरूषोत्तम पटले यांनी केले.
जिल्ह्यात १७ सप्टेंबरपासून ‘सुदृढ नारी सशक्त परिवार’ या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य प्रशासन सज्ज झाला असून या संदर्भात माहिती देताना डॉ.पटले बोलत होते.
जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.पुरूषोत्तम पटले पुढे म्हणाले, आरोग्य व परिवार कल्याण मंत्रालयाच्या वतीने ‘सुदृढ नारी सशक्त परिवार’ अभियानाची अंमलबजावणी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात येणार आहे.या अभियानातंर्गत माता आणि बाल आरोग्य सेवांमध्ये सुधारणा, किशोरवयीन मुलींमध्ये पोषण आणि अशक्तपणाबद्दल जागरूकता, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोग यासारख्या असंसर्गजन्य आजारांची तपासणी, क्षयरोग आणि कुष्ठरोग यासारख्या संसर्गजन्य आजारांची ओळख आणि उपचार यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आरोग्य आणि पोषण शिबिरे, तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली आरोग्य शिबिरे आणि स्वेच्छा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. यासोबतच पोषण, मासिक पाळीची स्वच्छता, योग आणि निरोगी जीवनशैलीशी संबंधित जागरूकता केली जाणार आहे. हे अभियान महिलांच्या सदृढ आरोग्य व सशक्तीकरणासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.पी.के.पटले यांनी व्यक्त केला. त्यामुळे महिला, किशोरवयीन मुलींनी या अभियानात सहभागी होवून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.पुरूषोत्तम पटले यांनी केले आहे.
……………………
महिलांचे आरोग्य व सक्षमीकरणावर भर : डॉ.तृप्ती कटरे
महिला आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्य समस्या वेळेवर ओळखून आवश्यक उपचार प्रदान करणे हे अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासोबतच, माता आणि बाल आरोग्य सेवांचा विस्तार, समाजात पोषण, स्वच्छता आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे, असंसर्गजन्य आजारांची वेळेवर जागरूकता आणि प्रतिबंध सुनिश्चित करणे आणि क्षयरोग आणि कुष्ठरोग निर्मूलनात समाजाचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी हे अभियान प्रभावी ठरणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून बालकांचे लसीकरण, पीएम-जय व आयुष्मान वय वंदना कार्ड वितरण, क्षय रूग्णांना निक्षय मित्र स्वयंसेवकांची मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शासनाचे हे अभियान महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल, असे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.तृप्ती कटरे यांनी व्यक्त केले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *