LatestNewsगोंदिया

gondia zp president  : जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांची जखमी व कुटुंबियांची भेट

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी चिमुकल्याला दिला आधार
दिनकरनगर :
  गेल्या 30 ऑगस्ट रोजी दिनकरनगर जवळील गोठणगाव परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांवर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात विहान भवतोस राय (वय 4) हा चिमुकला गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या गोंदिया येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या मदतीला धावलेल्या अजय प्रशांत सरदार हे देखील जखमी झाले आहेत.
ही धक्कादायक घटना समजताच जिल्हा परिषद अध्यक्ष (gondia zp president ) लायकराम भेंडारकर यांनी जखमींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी डॉक्टरांशी थेट संपर्क साधून विहान आणि अजय यांच्यावर योग्य ते उपचार होण्यासाठी आवश्यक त्या सूचनाही दिल्या.
या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष (gondia zp president ) लायकराम भेंडारकर यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीची आर्थिक मदत पुरवण्याची मागणी केली. तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सुरक्षा उपाययोजना करण्याचा इशाराही दिला. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असतानाच, जिल्हा परिषद अध्यक्ष (gondia zp president )  लायकराम भेंडारकर यांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता यामुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमी चिमुकल्याच्या कुटुंबीयांनाही या भेटीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. घटनेच्या वेळी प्रत्यक्ष साक्षीदार असलेले अजय सरदार यांनी जीवाची पर्वा न करता विहानला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पूजा लक्ष्मण मांढरे यांनी विहानला गाडीपर्यंत पोहोचवून मोठी मदत केली. या सर्वांनी दाखवलेल्या धैर्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष (gondia zp president ) लायकराम भेंडारकर यांनी विशेष कौतुक केले.
या भेटीप्रसंगी प्रतापगडचे सरपंच भोजराम लोगडे, रामनगरचे सरपंच संतोष मिर्धा, कोकण सरकार तसेच अनेक गावकरी उपस्थित होते. प्रशासनाकडून लवकरच आवश्यक ती मदत दिली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी दिली असून, वनविभागानेही या भागात गस्त वाढविण्याचे आश्वासन दिले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *