national sports day : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विजेत्या खेळाडूंचा सत्कार
भंडारा : स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे (national sports day ) औचित्य साधून भंडाऱ्यात विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, नेहरू युवा केंद्र, शिक्षण विभाग व विविध क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
गांधी चौक येथे पोलीस निरीक्षक (सायबर शाखा) अभिजित पाटील व जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लतिका लेकुरवाळे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून क्रीडा रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या रॅलीत जिल्ह्यातील शाळांचे क्रीडा मार्गदर्शक, शिक्षक, खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅली छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात दाखल झाल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्व. मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती शैलजा वाघ-दांदळे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लतिका लेकुरवाळे, पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, ‘मेरा युवा भारत’चे जिल्हा समन्वयक सुशिल भड, शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री. गजेंद्र भांडारकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी (national sports day ) आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलेल्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे खेळाडूंना नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाली. अध्यक्षीय भाषणात श्रीमती शैलजा वाघ-दांदळे यांनी “शारीरिक तंदुरुस्तीशिवाय जीवनात कोणत्याही क्षेत्रात यश मिळणे कठीण आहे. बळकट मन आणि शरीरासाठी क्रीडा आवश्यक आहे” असे प्रतिपादन केले. तर जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लतिका लेकुरवाळे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनाचा आढावा घेत खेळाचे महत्व पटवून दिले. (national sports day ) कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी निखिलेश तभाने, आकाश गायकवाड व प्रतिक लाडे यांचे सहकार्य लाभले. संचालन श्रीमती स्नेहल चौगुले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. अविनाश निवाते यांनी मानले.

