तंटामुक्ती अध्यक्षपदावर चरण शहारे यांचा दणदणीत विजय
सौंदड येथे अध्यक्षपदाची निवडणूक संपन्न
सडक अर्जुनी : सौंदड येथे तंटामुक्त अध्यक्ष पदाची निवडणूक २८ ऑगस्ट रोजी घेण्यात आली. यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात होते. दरम्यान जनसेवा परिवर्तन पॅनलचे उमेदवार चरण शहारे यांनी प्रतिस्पर्धी पॅनलच्या उमेदवारांचा दणदणीत विजय मिळवून अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान मिळविला आहे.
सौंदड ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत एकूण ४७३ मतदारांपैकी २६३ ग्रामस्थांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत जनसेवा परिवर्तन पॅनलतर्पेâ चरणदास जगन शहारे निवडणूक रिंगणात होते. तर विरोधी पॅनलकडून विवेकानंद प्रेमलाल एरावत व वसंता विठ्ठले ही निवडणूक रिंगणात होती. दरम्यान एकूण २६३ मतांपैकी १७१ मते मिळवत चरणदास शाहरे यांनी तंटामुक्ती अध्यक्षपदावर दणदणीत विजय संपादन केला.

या विजयामागे जनसेवा परिवर्तन पॅनलचे मार्गदर्शक हर्ष मोदी यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन व नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले. त्यांच्या दिशादर्शनाखाली कार्यकर्त्यांनी एकजुटीने अथक मेहनत घेतली. पंचायत समिती सदस्य सौ.वर्षाताई शहारे, पॅनलचे अध्यक्ष संदीप मोदी, उपाध्यक्ष शंकर खेकरे, तसेच सद्दू विठ्ठले, सावल इरले, देवेंद्र शिवणकर, मदन साखरे, ग्यानीराम किरणापुरे, शालिकराम निर्वाण, महिला अध्यक्ष सौ.रंजनाताई भोई, शाहरे यांचे मोलाचे योगदान विशेष अधोरेखित झाले. तसेच शमसुंदर अग्रवाल, रामकृष्ण चूटे, हिमांशू राऊत, नवज्योत तुमाने, इकबाल शेख, धर्मराज शेंडे, खुशाल ब्राह्मणकर, विजय चोपकर, सुनील डोये, मोरेश्वर चांदेवार, पुरुषोत्तम निम्बेकर, देवेन्द्र शिवणकर आदी कार्यकर्त्यांनी निर्णायक भूमिका बजावली.
निवडणुकीसाठी ग्रामपंचायत सदस्य कुंदाताई मदन साखरे, सुषमाताई ज्ञानेश्वर राऊत, प्रमिलाताई शालिकराम निर्वाण, अर्चनाताई सुभाष चन्ने, विजय विनोद चोपकर, खुशाल धनीराम ब्राह्मणकर यांनी सहकार्य केले. ग्रामस्थांनी शांततेत आणि लोकशाही पद्धतीने मतदान करून ग्रामसभा यशस्वी केली.
……………..
मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास कायम
सौंदड ग्राम पंचायतीत मागील काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच्या केंद्रस्थानी सरपंच व उपसरपंच आहेत. असे असताना तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सरपंच हर्षकुमार मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेले जनसेवा परिवर्तन पॅनलचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाला. या निकालातून ग्रामस्थांचा हर्ष मोदी यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास अधोरेखित झाला असून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ झाले आहेत.
………………..
‘जनसेवा परिवर्तन पॅनलच्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच हा यशस्वी निकाल लागला आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय आपल्या समर्पित कार्यकर्त्यांना आणि पदाधिकार्यांना आहे.
- हर्ष मोदी, सरपंच सौंदड

