LatestNewsगुन्हेवार्तागोंदियाविदर्भ

Gondia police: धारदार तलवारीसह सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

गोंदिया शहर पोलीसांची कामगीरी

गोंदिया : गोंदिया शहर पोलिस पेटोलिंगवर असताना एक आरोपी तलवार घेऊन फिरत असताना आढळून आला. त्याला थांबवून विचारपूस केली असता तो गुन्हा करण्याचं बेतात असल्याचे समजून आले. त्याच्या संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई शहर पोलिसांनी केली.

आगामी सण-उत्सवाच्या अनुषंगाने गोदिया शहर पोलीसांचे पथक हे १३ ऑगस्ट रोजी गोंदिया शहर परीसरात पेट्रोलीग करीत असतांनी एक इसम हा श्री आसाराम बापु आश्रम गोंदिया समोर बुलेट मोटार सायकलने पाठीच्या मागे लोखंडी तलवार बाळगुन फिरत आहे. अशी गोपनिय माहिती मिळाली. त्यानुषंगाने पथकाने त्याठीकाणी जावून खात्री केली असता एक इसम हा पोलीसांना पाहुन त्याची बुलेट मोटार सायकल ही रोडच्या कडेला खाली जागेत घेवून गेला. त्यामुळे पोलीसांना त्याच्यावर संशय आल्याने त्यास थांबवून त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव राकेश नानाजी खोब्रागडे, वय ३५ वर्षे, रा. मुरी गोंदिया असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता शर्टच्या आत पाठीमागे एका लाल रंगाच्या कव्हर मध्ये लोखंडी तलवार किं.अं. ५००/- रु. ची मिळून आल्याने आरोपीविरुध्द फिर्यादी पो.शि. मुकेश रावते, पो.स्टे. गोंदिया शहर यांचे तक्रारीवरुन पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे दि. १३/८/२०२५ रोजी अप.क्र. ६६७/२०२५ कलम ४,२५ भा.ह. का. अन्वये गुन्हा नोंद केला आहे. नमुद आरोपीविरुध्द अभिलेखावर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे असे गुन्हे नोंद आहेत. गुन्हयाचा तपास पो.हवा. भाटीया, पो.स्टे. गोंदिया शहर हे करीत आहेत.सदरची कामगीरी श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री. अभय डोंगरे, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, श्रीमती रोहीणी बानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक श्री किशोर पर्वते, डी.बी. पथकाचे पो.हवा. कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, निशिकांत लोंदासे, प्रमोद चव्हाण, सतिश शेंडे, दिपक राहांगडाले, पोशि. दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, मुकेश रावते, अशोक राहांगडाले, प्रमोद शेंडे, सोनु नागपुरे यांनी केली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *