सेवानिवृत्त कर्मचार्यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा : पी.आर.पारधी
तालुका कार्यकारिणीच्या सभेत आव्हान
गोंदिया : जिल्हातील सेवानिवृत शिक्षक, मुख्याध्यापक, आरोग्य सेविका, माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व अधिकार्यांच्या अनेक समस्या प्रशासन स्तरावर प्रलंबीत आहेत. त्या संदर्भात जिल्हा कार्यकारिणीने ३ सप्टेंबरला धरने आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. या संदर्भात संबधित विभागांना सुचनापूर्वक इशारा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी ३ सप्टेंबर रोजी संघटनेच्या नेतृत्वात होणार्या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येत सेवानिवृत्त कर्मचार्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पी.आर.पारधी यांनी केले आहे.
सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेत्तर अधिकारी, कर्मचारी संघटनेची तालुका कार्यकारणीची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे तालुका अध्यक्ष आर.के.ठाकरे होते. तर मार्गदर्शक म्हणून राज्य उपाध्यक्ष पी.आर.पारधी, जिल्हा उपाध्यक्ष जी.एफ.अंबुले, वाय.बी.चौहान आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी नविन सभासद नोंदणी करने, अंशराशीकरण व उपदान राशी मिळणे, आरोग्य सेविका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना संगणक राशी मिळणे, गट बिमा, निवडश्रेणी, एकस्तर वेतन श्रेणीचा लाभ मिळणे, रजा रोखीकरण राशी मिळणे, आदि विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे, प्रलंबित मागण्या व समस्यांना घेवून जिल्हा संघटनेच्या वतीने शासन, प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला जात आहे. परंतु, सेवानिवृत्तांच्या समस्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे संघटनेच्या वतीने शासन-प्रशासनाला अल्टीमेटम देवून ३ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात जिल्हाध्यक्ष एल.यु.खोब्रागडे यांनी जि.प.चे मुख्य कार्यपालनअधिकारी व इतर अधिकार्यांना या संदर्भात माहिती दिली आहे. पण प्रशासन उदासीन भुमिका घेत असल्याने आंदोलनाचा निर्धार करण्यात आला आहे. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचार्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आव्हान संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पी.आर.पारधी यांनी केले. यावेळी सी.बी.अंबुले, ए.पी.रिनायत, जी.आर.बोपचे, श्रीमती पी.डी.मेश्राम, पी.डी.पटले, एस.एम.हिंगे, पी.एल.पारधी व सभासद सदस्य उपस्थित होते.

