LatestNewsगोंदिया

Gram panchayat : ग्रामसभेला महिलांची उपस्थिती गावविकासाला गती देणारी : भोजराम लोगडे

प्रतापगड ग्रा.पं. सरपंचानी वाटप केल्या 400 महिलांना साड्या

अर्जुनी-मोर : शासनाचे गांव विकासाचे विवीध उपक्रम यशस्वी करण्यासाठी गावांतील महीला भगिणींचा सहभाग असने अत्यंत गरजेचे आहे. महीला आता घरकामा पुरतीच राहीली नसुन कौटुंबिक जबाबदारी सांभाळून बचतगटाच्या माध्यमातुन हिशोबनिस होवुन उद्योगशिल बनल्या आहेत. यामुळे कौटुंबिक संसाराची आर्थीक घडी निट सांभाळीत प्रत्येक घरात नवचैतन्य निर्माण करीत आहेत. अशा रणरागीनींचा कुठेतरी सन्मान व्हावा या उद्देशाने Gram panchayat प्रतापगडच्या वतीने लाडक्या माता भगीणींचा आम्ही साडी वाटप करुन सन्मान करीत असल्याचे प्रतिपादन ऐतिहासिक तिर्थक्षेत्र प्रतापगड चे सरपंच भोजराम लोगडे यांनी केले. जरुघाटा, कढोली व प्रतापगड या गटग्रामपंचायत च्या वतीने ता.29 आयोजीत ग्रामसभेत सरपंच लोगडे बोलत होते. सर्वप्रथम ग्रामसभेच्या विषय सुचीनुसार सर्व विषयावर साधकबाधक चर्चा करण्यात आली. यावेळी गावाच्या विकासासंदर्भात विविध ठराव सुध्दा घेण्यात आले. Gram panchayat ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच भोजराम लोगडे होते. प्रतापगड ग्रामपंचायत मधे सलग सात वर्ष सेवा देणारे ग्रामपंचायत अधिकारी डि.जे.दरवडे यांची बदली झाल्याने त्यांचा ग्रामपंचायत व ग्रामवासियांचे वतीने शाल श्रीफळ व भेटवस्तु देवुन सत्कार करण्यात आला.Gram panchayat ग्रामसभेचे औचित्य साधुन कढोली, जरुघाटा, प्रतापगड या तिन्ही गावातील महिला भगीणींसाठी हळदीकुंकु कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी Gram panchayat सरपंच भोजराम लोगडे यांनी आपल्या पाच वर्षाच्या मानधनातून तिन्ही गावातील 400 महिलांना हळदीकुंकु निमित्त साडी वाटप केल्या. ग्रामसभेला ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी व ग्रामवासी मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *