ShivSena Sadak Arjuni : आगामी निवडणुकीसाठी सज्ज व्हा : मनोहर चंद्रिकापुरे
शिवसेनेची आढावा बैठक
कार्यकर्त्यांना माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी घेतला आढावा
सडक अर्जुनी (गोंदिया) : नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. तसेच निवडणूक कार्यक्रमानुसार यंत्रणाही कामाला लागली आहे. त्यासाठी आतापासूनच आपण कामाला लागले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अधिकाधिक जागा आपल्याला कशा प्रकारे जिंकून आणता येईल यासाठी आपला प्रयत्न व संघर्ष सुरू असला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. ज्या कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी झेंडे लावले आणि आम्हाला मदत केली. आम्ही त्यांच्यासाठी काम करणार आहोत. मात्र कार्यकर्ता म्हणून आपण येणार्या निवडणुकीसाठी आपल्या मनाची तयारी ठेवली पाहिजे.े एवढेच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज असले पाहिजे . असे मौलिक विचार शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १९ ऑगस्ट रोजी माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या एरिया ५१ कोहमारा येथील जनसंपर्क कार्यालयात प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्याची आढावा बैठक पार पडली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सभेत प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्र, पंचायत समिती, नगरपंचायतीत पक्षाची सध्याची स्थिती काय आहे? सदस्य नोंदणी किती झाली आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कशी तयारी झाली आहे? याबाबत चंद्रिकापुरे व अन्य नेत्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून माहिती जाणून घेतली.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू, जिल्हा महिला प्रमुख माया शिवणकर , जिल्हा महिला उपाध्यक्ष सरिता कापगते, युवा जिल्हा प्रमुख अर्जुन बैस, तालुका प्रमुख विलास कापगते, विधानसभा प्रमुख जितेंद्र मौर्य, अनिल सोनकंवर, योगानंद परकीवॉर, महिला प्रमुख सिंधु बारसागडे, तुलसीदास शिवणकर, पूजा राऊत, माधव तरोने, गिरीपाल फुले ,गोवर्धन खोब्रागडे, महेश डुंभरे, उमराव मांढरे, मधु हर्षे, कमलेश वालदे, नीलेश वाडकर, ओमराज दखणे, तेजराम चुटे, लक्ष्मीकांत तागडे, नवीन चक्रवर्ति, संतोष उइके, जणार्धन राऊत, राजेश आरसोडे, धरमलाल मांढरे ,राजकुमार शहारे, चोखेलाल बडोले, अनमोल निकुरे , रोहित जनबंधू, दिनेश मसराम, करुणाताई गेडाम, संध्याताई श्रीरंगे, सरिताताई वैद्ये, ज्योति पंचभाई , निशा राऊत, अस्मिता बडोले, ज्योति राऊत, रेखा मेश्राम, राजेश्वर साखरे, अभय बडोले, अनिकेत बडोले, वीपेन्द्र बडोले, गौरव लंजे, सरिता मेश्राम, लक्ष्मी डोंगरवार, कैमवंता बडोले, विद्या खोब्रागडे, प्रणय कुंडे, सोनू बहेकार, प्रणय फुंडे, प्रमोद झिंगरे, नीलेश पारधी, सूरज मूनीश्वर, मंगेश मटाले, चंद्रपाल गायधणे, राजू चुटे, विठोबा भांडारकर, कपिल मेश्राम, विजय पंचभाई, करुणा उके, पपीता मेश्राम, सत्यशिला फुल्लुके, जगणनाथ लंजे तसेच तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

