janmashtami 2025: ‘ जन्माष्टमी’ ला वृद्धि योगचा संयोग
भरणी नक्षत्र, वृद्धी व ध्रुव योगात साजरा होणार श्रीकृष्ण जन्मोत्सव
भंडारा : श्रीकृष्ण भक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते, तो दिवस म्हणजे जन्माष्टमी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे, दरवर्षी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा शुक्रवारी (दि. १५) देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेले तर, जन्माष्टमीच्या पवित्र दिवशी वृद्धी योगाचा एक मोठा संयोग देखील निर्माण होत आहे, पौराणिक मान्यतेनुसार, जगाचे तारणहार भगवान विष्णूचे रूप मानल्या जाणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचा जन्म द्वापार युगात भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला मध्यरात्री झाला. म्हणूनच, दरवर्षी या तारखेला जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी अनेक लोक कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी उपवास देखील केले जातात.
यावर्षी जन्माष्टमी १५ ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून जन्माष्टमीचा दिवस देखील विशेष आहे. कारण १५ ऑगस्ट रोजी वृद्धी योगाचा एक मोठा संयोग घडत आहे. सनातन धर्मग्रंथांमध्ये असे नमूद आहे की जगाचे तारणहार भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला झाला होता. यासाठी दरवर्षी भाद्रपद महिन्यात कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. जर तुम्हालाही जगाचे स्वामी भगवान श्रीकृष्ण यांचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भक्तीभावाने बांके बिहारीची पूजा करा. जन्माष्ठमीच्या दिवशी भक्त या दिवशी लाडू गोपालाचे विशेष पूजन करतात व त्यांना आवडणाऱ्या पदार्थांचा भोग अर्पण करतात. यंदा जन्माष्टमीला वृद्धी योग, ध्रुव योग आणि भरणी नक्षत्र यांचा संगम होत असून, यामुळे उत्सवाची पावित्र्यता आणि महत्त्व अधिक वाढले आहे. धार्मिक मान्यतेनुसार द्वापर युगात भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी व रोहिणी नक्षत्राच्या संयोगात मथुरेतील कारागृहात देवकी आणि वसुदेव यांच्या पोटी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. त्या काळी मथुरा राजा कंसाच्या अत्याचाराखाली होती. श्रीकृष्णांनी जन्म घेताच कंसाचा अंत करून धर्माची पुनर्स्थापना केली. त्यामुळे जन्माष्टमी हा केवळ जन्मोत्सव नसून आशा, न्याय व धर्म विजयाचा संदेश देणारा दिवस आहे.
———————–

जन्माष्टमी २०२५ तारीख आणि वेळ
१५ ऑगस्ट २०२५ – स्मार्त संप्रदाय
विशेष योग : वृद्धि योग १६ ऑगस्ट सकाळी १०:१८ ते १७ ऑगस्ट सकाळी ७:२१ पर्यंत
नक्षत्र : भरणी १५ ऑगस्ट सकाळी ६:०६ पर्यंत, त्यानंतर कृत्तिका नक्षत्र
ग्रहस्थिती : चंद्र मेष राशीत, सूर्य कर्क राशीत
रात्रपूजा वेळ : १६ ऑगस्ट रात्री १२:०४ ते १२:४७
अष्टमी तिथी व रोहिणी नक्षत्र वेळ
अष्टमी प्रारंभः १५ ऑगस्ट रात्री ११:४८
अष्टमी समाप्तः १६ ऑगस्ट रात्री ९:३४
भजन-कीर्तनांनी वातावरण भक्तिमय
जन्माष्टमीच्या दिवशी देशभरातील मंदिरे फुलांनी व रोषणाईने सजवली जातात. बालकृष्णाच्या लीलांची झांक्या माखन चोर, गोवर्धन धारणा, रासलीला भक्तांना दाखवल्या जातात. भजन-कीर्तनांनी वातावरण भक्तिमय होते. मध्यरात्री श्रीकृष्णाच्या जन्मक्षणी मंदिरांत घंटानाद, शंखनाद व ‘जय श्रीकृष्ण’च्या घोषणांनी माहोल रोमांचक होतो. भक्त उपवास व व्रत पाळून या क्षणी आरती करून पूजनाचा समारोप करतात. अनेक ठिकाणी दुसऱ्या दिवशी दही हांडी उत्सव आयोजित होतो. मानवी पिरॅमिड बनवून मटकी फोडण्याची परंपरा श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण करून देते.

