LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

‘हर घर तिरंगा,  हर घर स्वच्छता उपक्रमाला सुरुवात

महिला सहभागातून स्वच्छतेची व्यापक जनजागृती व्हावी :  उपसभापती श्री बोरकर

भंडारा : 79 वा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर 8 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ हा विशेष उपक्रम  जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. पंचायत समिती तुमसर अंतर्गत गटविकास अधिकारी श्री नंदकुमार वाळेकर यांचे नेतृत्वात सर्व ग्रामपंचायत मध्ये हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता उपक्रम राबविण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा तुमसर तालुकास्तरीय शुभारंभ आज दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी पंचायत समिती तुमसर येथे पंचायत समिती सभागृहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती तुमसरच्या सभापती मा. सौ. दीपिका गौपाले होत्या, तर प्रमुख उपस्थिती उपसभापती मान. सुभाषजी बोरकर यांची होती. तर कार्यक्रमास पंचायत विस्तार अधिकारी श्री. राजू महंत, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार श्री. राजेश्वर येरणे, तालुका अभियान व्यवस्थापक (उमेद) श्री. बिसेन, श्री ठाकरे, गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) गट समन्वयक म. पल्लवी तिडके, समूह समन्वयक कु. हर्षाली ढोके यांचीही उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पंचायत समिती उप सभापती श्री. बोरकर यांनी, महिलांच्या स्वच्छता मोहिमेतील योगदानावर भर दिला. त्यांनी सांगितले की, “गाव पातळीवर महिलांनी स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती केल्यास केवळ परिसर स्वच्छ होणार नाही, तर  आरोग्यही निरोगी ठेवण्यास मदत होईल. या अभियानामध्ये महिलांसह नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन गाव स्वच्छ व सुंदर करावे असे आवाहन केले. यावेळी, माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार श्री. राजेश्वर येरणे यांनी पालघर तिरंगा आणि खारघर स्वच्छता या कार्यक्रमाचा उद्देश्य स्पष्ट करत, 15 ऑगस्टपर्यंत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सर्व ग्रामपंचायतींना या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासोबतच स्वच्छता मोहिमेची अंमलबजावणी करून नागरिकांमध्ये स्वच्छतेची सवय रुजविण्यावर भर दिला जाणार आहे. तालुकास्तरीय कार्यक्रमानंतर खापा आणि स्टेशन टोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देखील ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
000000

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *