कृषी विज्ञान केंद्र, हिवरा येथे भव्य राणभाजी महोत्सवाचे आयोजन
गोंदिया, : कृषी विज्ञान केंद्र, हिवरा (ता. गोंदिया) येथे पारंपरिक आणि पोषक रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या “जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे” भव्य आयोजन दिनांक ११ ऑगस्ट २०२५ ला करण्यात आले. हा महोत्सव ग्रामीण भागातील स्त्रियांच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून रानभाज्यांना चालना देणारा आणि स्थानिक अन्नसंस्कृतीचा गौरव करणारा ठरला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रजित नायर, जिल्हाधिकारी, गोंदिया हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अविनाश लाड, जिल्हा व्यवस्थापक, नाबार्ड, श्री. अतुल देवकर, विभागीय वन अधिकारी, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, श्री. निलेश कानवडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी; श्री. समशेर पठाण, तहसीलदार, गोंदिया; श्री. अजित अडसूळे, प्रकल्प संचालक, आत्मा, श्री. महेंद्र ठाकुर, डॉ. टी. एम. टेंभरे, सहायक प्राध्यापक आणि श्री. विशाल उबरहंडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, गोंदिया यांची उपस्थिती लाभली.
महोत्सवामध्ये १०० हून अधिक रानभाजीचे स्टॉल्स उभारण्यात आले होते, जिथे महिलांनी स्थानिक रानभाज्यांचे सादरीकरण केले. विविध प्रकारच्या रानभाज्यांची माहिती, त्यांचा आहारामध्ये उपयोग, औषधी गुणधर्म आणि व्यावसायिक मूल्य यावर भर देण्यात आला. यामध्ये भुईकोहळा, केव, तेरडा, फोडशी, अगंठा, माठ, कोलम आणि अशा अनेक दुर्मिळ रानभाज्यांचा समावेश होता.या महोत्सवाचा मुख्य आकर्षण बिंदू म्हणजे रानभाजी पाककला स्पर्धा, ज्यामध्ये विविध महिला बचतगट आणि ग्रामीण गृहिणींनी सहभाग नोंदवला. पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या चविष्ट आणि पौष्टिक रानभाजीच्या पदार्थांनी परीक्षकांची मनं जिंकली. या स्पर्धेमुळे महिलांना आपली कला सादर करण्याची आणि स्थान दिले.

