LatestNewsUncategorizedगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

आ. नाना पटोले यांनी केले मामा तलावाच्या पाळीचे निरीक्षण

नुकसानग्रस्त शेतकरी व मच्छीमारांना तातडीने मदत देण्याचे निर्देश। पुनर्बाधणीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

साकोली/सेंदूरवाफा: सुमारे ९० एकर क्षमतेच्या ऐतिहासिक मामा तलावाची पाळ १ ऑगस्टच्या पहाटे अचानक फुटल्याने साकोली व गडकुंभली परिसरातील शेतकरी व मच्छीमार बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर आज या भागाचे आ. नाना पटोले यांनी घटनास्थळी भेट देऊन फुटलेल्या पाळीचे तसेच बाधित शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी तात्काळ नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले.तलाव फुटीची गंभीरता लक्षात घेत आमदार पटोले यांनी तलावाच्या दुरुस्तीबाबत बांधकामाची पाहणी करत, लघुपाटबंधारे विभागाच्या अभियंता चाचेरे यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम प्रस्ताव तयार करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच, उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांनी जलसंधारण व कृषी विभागाला संबंधित शेतकरी व मच्छिमारांना लवकरात लवकर मदतीचा लाभ देण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या.

या पाहणीवेळी उपविभागीय अधिकारी स्वाती देसाई, तहसीलदार निलेश कदम, लघुपाटबंधारे विभागाचे अभियंता चाचेरे, भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कविता उईके, बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर, शहराध्यक्ष दिलीप मासुरकर, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सोनू बैरागी, नंदू समरीत, नगरपरिषदेचे कर्मचारी शुभम द्रुगकर तसेच स्थानिक कार्यकर्ते, शेतकरी, मच्छिमारबांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तलाव फुटीमुळे झालेल्या नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेता, आ. पटोले यांनी संबंधित विभागांसोबत समन्वय साधत तातडीने मदत पोहोचवण्यावर भर दिला आहे. पाळीच्या मजबूत पुनर्बाधणीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यामुळे शेतकरी व मच्छिमारांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *