ट्रॅक्टरच्या धडकेत सीआरपीएफ जवान ठार
नेरी – जांभुळघाट रोडवरील घटना, पत्नीला भेटण्यासाठी जात असताना वाटेतच जवानाचा अपघातचिमुर : जांभुळघाट – नेरी मार्गावर ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी स्वार घटनास्थळी ठार झाल्याची घटना आज शनिवार दि. ९ ऑगस्टला सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान घडली. अविनाश शामराव खेडेकर (वय ३५ वर्ष) रा. मोहाडी चक तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर असे मृतकाचे नाव असून तो सीआरपीएफ जवान वडसा येथे कार्यरत होता. ९ ऑगस्टला कळमगाव येथे त्यांची पत्नी प्रांजली अविनाश खेडेकर, किरण लेदे (साळा), अनिशा अतुल खेडेकर (भावसुन) यांना भेटण्यासाठी तो आपल्या एम एच ३४ बि डब्लू १०० या क्रमांकाच्या बुलेटने असतांना गोरखेडा तलावाजवळ समोरून येत असलेल्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. यातच अविनाश खेडेकर यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. अपघात ऐवढा भयकर होता की ट्रक्टरची कॅबीन तुटून बाहेर पडली. घटनेची माहिती मिळताच एपीआय मल्लारी ताळीकुटे घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
कार व दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार जखमी
तळोधी बा.: नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील चेतन रमेश डोंगरवार (१६) हे भरधाव वेगात दुचाकीने सावरगावकडे जात असताना सावरगाव कडून वाढोणा कड़े येणाऱ्या कार व दुचाकीमध्ये जबर धडक झाली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार दि. ९ ऑगस्टला सकाळी घडली. संजय गहाणे हे आपल्या मित्रपरिवार सहित वाढोणा कडे एम. एच. ४९ बी. बी. ८४४२ या चारचाकी वाहनाने वाढोणाकडे जात असताना सावरगाव स्मशानभूमी जवळ वाढोणा कडून येणाऱ्या मोटार सायकल स्वार चेतन डोंगरवार हे एम. एच. ३४ ए. आर. ३४५५ क्रमांकाच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार चेतन डोंगरवार हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधाकर भानारकर व अंमलदार अल्का डुकरे हे करीत आहेत.

