LatestNewsUncategorizedगोंदियामहाराष्ट्रविदर्भ

कृषि विज्ञान केंद्र हिवरा येथे शाश्वत शेती दिन कार्यक्रमाचे आयोजन

गोंदिया : कृषि विज्ञान केंद्र हिवरा, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा गोंदिया व तालुका कृषि अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने 7 ऑगस्ट 2025 रोजी कृषि विज्ञान केंद्र हिवरा येथे डॉ. एस.एस.स्वामीनाथन यांच्या जयंती निमित्ताने शाश्वत शेती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख विशाल उबरहांडे होते.

प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कृषि विकास अधिकारी मनोज आसवले, उपविभागीय कृषि अधिकारी महेंद्र ठोकळे, शेतकरी शास्त्रज्ञ फोरमचे अध्यक्ष महेंद्र ठाकुर, किटकशास्त्र विभागाचे विषय विशेष तज्ञ आर.डी.चव्हाण, उद्यानविद्या विभागाचे विषय विशेष तज्ञ डॉ.विजय कोरे, दुग्ध व्यवसाय विभागाचे विषय विशेष तज्ञ श्रीमती सरप, तालुका कृषि अधिकारी गोंदिया नेहा आढाव, मंडळ कृषि अधिकारी दासगाव सुमित नंदनवार, उप कृषि अधिकारी टी.एस.तुरकर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा गोंदिया सुनिल खडसे, सहायक कृषि अधिकारी रिंकु मंडल उपस्थित होते. यावेळी मनोज आसवले यांनी शाश्वत शेती म्हणजे काय व रासायनिक खते व किटकनाशके जास्त प्रमाणात वापरत असल्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमा कमी होत आहे, पाण्याचे स्त्रोत आटत आहेत अशावेळी शाश्वत शेती काळाची गरज आहे असे सांगितले. महेंद्र ठोकळे यांनी स्थानिक हवामान व परिस्थितीनुसार योग्य पिकांची लागवड करणे, पिकांची फेरपालट व कमी पाण्याच्या पिकाच्या लागवडीबद्दल व गटामार्फत गावामध्येच निविष्ठा निर्मिती करणे, जेणेकरुन शेतकऱ्यांना सेंद्रीय निविष्ठा वापरणे सोपे जाईल असे सांगितले. महेंद्र ठाकुर यांनी भात पिकाएैवजी भाजीपाला तसेच फळबाग पिकाकडे शेतकऱ्यांनी वळले पाहिजे, कारण की भात पिकाला पाणी जास्त प्रमाणात लागते असे सांगितले. तसेच माती परिक्षणचे फायदे, जमिनीमध्ये सेंद्रीय कर्बचे प्रमाण कसे वाढविता येईल यावर मार्गदर्शन केले व पुढील वर्षी शाश्वत शेती दिन कार्यक्रमाचे आयोजन शेतकऱ्यांच्या शेतावर करण्यात यावे असे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा गोंदिया सुनिल खडसे यांनी केले. कार्यक्रमाला गोंदिया तालुक्यातील डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेतील गटांचे व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *