LatestNewsगोंदियाविदर्भ

Collector Gondia; विकासाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी प्रजित नायर

गोंदिया : जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत सर्वसाधारण संदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी आज जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनात्मक बैठक घेण्यात आली. यावेळी संबंधित यंत्रणांनी विकासाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत सर्वसाधारण संदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरूगानंथम,जिल्हा नियोजन अधिकारी सुनील धोंगडे, सहाय्यक ‍जिल्हा नियोजन अधिकारी रूपेश राऊत, जि.प. लघु पाटबंधारे कार्यकारी अभियंता सत्यजीत राऊत यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


बैठकीत आगामी आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी, निधीचे योग्य नियोजन व वितरण, तसेच प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी प्रक्रियेत सुसूत्रता निर्माण करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. जिल्हाधिकारी नायर यांनी निर्देश दिले की, पायाभूत सुविधेसाठी प्रशासकीय मान्यता देण्यापूर्वी ऑनलाईन युनिक आयडी क्रमांक मिळविणे अनिवार्य राहील. संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करावे. विकासकामांमध्ये गती यावी, प्रलंबित प्रस्ताव लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावेत आणि निधीचा योग्य व नियोजित वापर व्हावा, असे त्यांनी सांगितले. बैठकीदरम्यान विविध विभाग प्रमुखांनी त्यांच्या योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी, प्राधान्यक्रम व स्थानिक गरजा मांडल्या. यावर चर्चा करून सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांची नोंद घेण्यात आली.
00000

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *