LatestNewsगोंदियाविदर्भ

Bee Attack: मधमाशांच्या हल्ल्यात सेवानिवृत्त शिक्षक ठार

येरंडी / देवल. येथील घटना
अर्जुनी-मोरगांव :
शेताची पहाणी करण्याकरिता आपले मुळगाव येरंडी / देवल. येथे गेले असता अचानक मधमाशांनी हमला केल्याने सेवानिवृत्त शिक्षक मनोहर सदाशीव बोरकर वय 65 वर्ष हे मृत पावल्याची घटना आज 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार  मनोहर सदाशिव बोरकर सेवानिवृत्त शिक्षक  यांचे  मुळगाव येरंडी देवलगाव  आहे.  नोकरी निमित्त ते  धर्मकाटा दाभना रोड अर्जुनी मोर. येथे स्थायिक झाले आहेत.  आज  16 ऑगस्ट  ला सकाळच्या सुमारास ते आपल्या मुळगावी येरंडी / देवल.येथे शेतावर गेले होते. त्यावेळी अचानकच  मधमाश्यांनी हल्ला चढविल्याने ते गंभीर जखमी होवुन घटनास्थळावरच बेशुध्द  झाले, लगेच त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांचेवर  16 ऑगस्ट 2025 ला ठीक 4=00 वाजता स्थानिक मोक्षधाम अर्जुनी मोर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *