रेल्वे स्टेशन (railway station gondia) येथे जागतिक मानव तस्करी विरोधी दिन कार्यक्रम साजरा
गोंदिया : (railway News) “अॅसेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रेन” या उपक्रमांतर्गत दि.30 जुलै 2025 रोजी रेल्वे सुरक्षा बल (RPF) व इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व चाईल्ड लाईन यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे स्टेशन गोंदिया येथे जागतिक मानव तस्करी विरोधी दिन निमित्त विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन मृत्युन्जय रॉय, मुख्य स्टेशन प्रबंधक गोंदिया यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष देवका खोब्रागडे अध्यक्ष बाल कल्याण समिती होते. यावेळी मुख्य अतिथी म्हणून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे, जी.आर.पी, पोलीस उपनिरिक्षक चंद्रकांत भोयर, इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया संचालक अशोक बेलेकर, बाल कल्याण समिती सदस्य मनोज रहांगडाले, अलका बोकडे, वर्षा हलमारे, जयश्री कापगते, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या ॲड. एकता गणवीर, पोलीस उपनिरिक्षक पुजा सुरडकर, चीफ कमर्सियल क्लार्क अजित कुमार, अॅसेस टू जस्टिस- इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर पटले, मुख्य स्वास्थ निरीक्षक रेल्वे स्टेशन अमोल मेश्राम, चाईल्ड हेल्पलाईन कर्मचारी, जिल्हा महिला बाल विकास कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात मानव तस्करीचे वाढते प्रकार, तस्करीची कारणे व स्त्रोत, तसेच बालकांचे संरक्षण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक पातळीवर कोणकोणत्या उपाययोजना प्रभावी ठरू शकतात यावर भर देण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे मानव तस्करी या गंभीर सामाजिक समस्येविषयी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे, तसेच सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय निर्माण करून एकत्रित कृतीला चालना देणे हा होता. बाल तस्करी थांबवायची असेल तर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. जेव्हा बाल तस्करी करणाऱ्यांना जलद आणि कठोर शिक्षा दिली जाईल तेव्हाच आपण त्यांच्यात कायद्याची भीती निर्माण करू शकू आणि ही भीती तस्करी रोखण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय ठरेल. प्रतिबंध मोहिमांच्या यशासाठी जिल्ह्यात मजबूत प्रशासकीय समन्वय आणि वेळेवर कायदेशीर कारवाई आवश्यक आहे. अशा प्रकारे काम करून, आपण केवळ मुलांचे संरक्षण करू शकणार नाही तर मुलांची शिकार करणाऱ्या तस्करी टोळ्यांचे जाळे देखील नष्ट करू शकू असे सांगण्यात आले.
कार्यक्रमात RPF, GRP, श्रम निरीक्षक, मुख्य स्टेशन व्यवस्थापक, टीटीइ, वेंडर, कुली , सर्व ऑटोचालक व प्रवासी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सर्वांनी मानव तस्करी विरोधात जनजागृती करणे व सहकार्य करण्याचा संकल्प केला. यावेळी जे.आर.सी. कडून प्राप्त झालेलीतस्करी विरोधी ऑडिओ व व्हिडिओ क्लिप रेल्वे स्थानकात हिंदी व इंग्लिश भाषेतून अनाउन्समेंट करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार अॅक्सेस टू जस्टिस – इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर पटले यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजन व यशस्वीतेसाठी पुर्णप्रकाश कुथेकर, दीपमाला भालेराव, अनिता ठाकरे, भाऊराव राउत, भाग्यश्री ठाकरे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे मुकेश पटले, धर्मेंद्र भेलावे, भागवत सूर्यवंशी, नरेश लांजेवार, चाईल्ड लाईनचे पुजा डोंगरे, अजय खोब्रागडे व रेल्वे सुरक्षा बल, GRP व रेल्वे स्टेशन अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.