LatestNewsगोंदियाविदर्भ

देवरीत भीषण अपघात, एक ठार, ४ जखमी

ट्रक चेचीस दुकानात घुसला, अनेक वाहनांचे मोठे नुकसान

राष्ट्रीय महामार्ग क्रं.५३वरील घटना

देवरी,ता.०१: देवरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रं.५३ वरील नगर पंचायत जवळील विजेच्या खांब्याला लागून असलेल्या एका मोठ्या दुकानात आज शुक्रवारी (ता.१ ऑगस्ट) रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने धावणाऱ्या अशोक लेल्यांड कंपनीचा ट्रक चेचीस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात घडला. झालेल्या या भीषण अपघातात ६० वर्षीय सुखदास गावडकर रा. जरताळटोला या इसमाचा जागीच मृत्यू झाला. तर टीकेश राऊत (वय ३८)रा. पिंडकेपार, निलेश वधारे (वय ३७ ) सुभाष बिंजलेकर (वय ४५) दोन्ही रा.देवरी, सुरेंद्र बनसोड (वय ५२) रा.धोबीसराड, जखमी झालेल्यांची नावे आहेत. या ट्रकच्या चेचीसने रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांना धडक दिल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या भिषण अपघातात ट्रक चेचीस थेट नगर पंचायत जवळील विजेच्या खांब्याला लागून असलेल्या एका मोठ्या दुकानात घुसला. त्यामुळे परिसरात काही वेळासाठी प्रचंड गोंधळ उडाला आणि वाहतूक व्यवस्था कोलमडली. राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वर स्थित असलेल्या तालुक्याचे ठिकाण देवरी हा शहर अत्यंत गजबजलेला आणि गर्दीचा परिसर आहे. जिथे नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक आणि नागरिकांची वर्दळ असते. आज शुक्रवारी हा ट्रक चेचीस नागपूर कडून रायपुर कडे जात असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रक चेचीसने रस्ता दुभागून रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांना धडक दिली. त्यानंतर ट्रक चेचीस थेट दुकानात जाऊन धडकला. यावेळी रोडच्या कडेला असलेला सुखदासला ट्रक चेचीस चिरडत नेल्याने त्याचा चेंदामेंदा होऊन जागीच ठार झाला. तर दुकानात बसलेले चार व्यक्ती गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्यांना प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

सदर अपघातात २ दुचाकी व १ चारचाकी वाहनाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच लोकांची एकच गर्दी घटनास्थळी जमली. अपघातग्रस्तांना ग्रामीण रुग्णालयात पाठविले. घटनेचा तपास देवरी पोलीस करीत असून पोलिसांनी ट्रक चेचीस चालकाला ताब्यात घेतले आहे.

देवरी येथे उड्डाण पुलाची नितांत गरज

राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वर स्थित असलेला देवरी शहरात नागरिकांची तुंबड गर्दी असते. तसे वाहने सुसाट वेगाने धावत असतात. याकरिता देवरी शहराला उड्डाण पुलाची नितांत गरज आहे. देवरी शहराला जर उदान पूल असता तर असे अपघात टळू शकले असते.असे येथील बुध्दीजीवी नागरीकांचे म्हणने आहे.#(टिप:- या बातमी सोबत नगर पंचायत जवळील विजेच्या खांब्याला लागून असलेल्या दुकानात ट्रक चेचीस ने धडक दिल्याची फोटो पाठविली आहे.)

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *