01 ऑगस्ट; अण्णा भाऊ साठे जयंती” लेखन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करा
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती अभिवादन कार्यक्रम
गोंदिया : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विश्वशाहीर परिषद व संविधान मैत्री संघ, सर्वसमाज विचार मंच, एम.जी. पैरामेडिकल कॉलेज एडमिनिस्ट्रेशन यांच्या संयुक्त वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम स्थानिक एम.जी.पैरामेडिकल कॉलेज मुर्री रेल्वे चौकी येथे उत्साहात साजरे करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंत गवळी होते. प्रमुख अतिथी म्हणून छैलबिहारी अग्रवाल, सीपी बिसेन, भोजराज ठाकरे, रमेश बिसेन, वजीर बिसेन, सुंदरलाल लिल्हारे, यशवंत रामटेके, करुणा राजु कामत, पंचशील पानतावणे, शीतल बोरकर, लालाजी कुचेकर, पंढरी वानखेड़े, मनोहर बावने, एस.पी.बोरकर, ए.एल.बनसोड, अरुण बन्नाटे, तिलक दीप, राजेंद्र दुबे, अतुल सतदेवे एम.जी.पैरामेडिकल कॉलेज तर्पेâ संस्थापक अनिल गोंडाणे, प्राचार्य अनुसया लिल्हारे, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी प्रीति वैद्य, छाया राणा, रामेश्वर पटले, आरती राऊत, मनीष चौधरी, सौरभ बघेल, प्रज्ञा गावडे, राजाभाऊ उंदीरवाडे, सम्यक गजभिये, आकाश श्रुती, रूपाली धमगाए प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन विद्यार्थिनी नंदिनी खोटेले हिने केले तर उपस्थित मान्यवर अतिथि व विद्यार्थ्यांचे आभार प्रा.प्रीति वैद्य यांनी मानले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करीत अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. संघर्ष साहित्य आणि लोककला यांचा अद्वितीय संगम म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे! शोषित, वंचित, कामगार, मजूर व भटक्या-विमुक्त समाजाचा आवाज मजबूत करत, अण्णाभाऊंनी आपल्या लेखणी आणि शाहिरीच्या जोरावर समाज परिवर्तनाची धगधगती मशाल पेटवली. ‘माझी मैना गावाकडं राहिली’ व ‘फकिरा’सारख्या अजरामर कलाकृती त्यांनी समाजाला दिल्या. आपल्या साहित्यातून त्यांनी कायमच अन्याय व विषमतेविरुद्ध वाचा फोडली. त्यांच्या ह्या सर्जनशील सामाजिक योगदानाचा वारसा आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असा संदेश देण्यात आला. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती लेखन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करण्यात यावी, अशी मागणी शासनाला करण्यात आली.