LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

समुदाय संसाधन व्यक्तींच्या मानधनाचा मार्ग मोकळा; खा. प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याला यश

पाच महिन्यांच्या मानधनासाठी ७३.२३ कोटींचा निधी वितरित ‘उमेद’च्या महिला कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

गोंदिया : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (‘उमेद’) ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या समुदाय संसाधन व्यक्तींचे (CRPs) गेल्या मार्च महिन्यापासून रखडलेले मानधन अखेर वितरित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांनी राज्य सरकारकडे केलेल्या प्रभावी पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून पाच महिन्यांच्या मानधनापोटी तब्बल ७३ कोटी २३ लाख ७० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून वितरणाचे आदेशही जारी झाले आहेत. त्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेकडो महिला संसाधन व्यक्तींना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिक स्तर उंचावणे, त्यांना स्वावलंबी बनविणे आणि बचत गटांचे सक्षमीकरण करणे यासाठी समुदाय संसाधन व्यक्ती (सीआरपी) अत्यंत तळमळीने काम करतात. केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने त्यांना मानधन दिले जाते. मात्र, मार्च ते जुलै या पाच महिन्यांच्या कालावधीत राज्य शासनाकडून मिळणारा मानधनाचा हप्ता थकला होता. सातत्याने पाठपुरावा करूनही मानधन मिळत नसल्याने या महिला कर्मचाऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले होते आणि कौटुंबिक उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. खासदार प्रफुल पटेल यांच्याकडे मांडली होती व्यथानुकत्याच झालेल्या गोंदिया जिल्हा दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील ‘उमेद’ अभियानातील साधन व्यक्तींच्या शिष्टमंडळाने खासदार प्रफुल पटेल यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदार पटेल यांनी तात्काळ महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या मुख्य सचिवांना दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि निधी लवकरात लवकर वितरित करण्याचे कडक निर्देश दिले. ७३.२३ कोटी रुपयांचा निधी वर्गखासदार पटेल यांच्या निर्देशानंतर मंत्रालयात गतिमान हालचाली झाल्या आणि शासनाने पाच महिन्यांच्या थकीत मानधनापोटी ७३ कोटी २३ लाख ७० हजार रुपयांचा निधी वितरित करण्याचा अधिकृत शासन निर्णय २२ सप्टेंबर रोजी जारी केला. हा प्रदीर्घ काळ रखडलेला प्रश्न मार्गी लागल्याने महिला प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले असून, सर्व समुदाय संसाधन व्यक्तींतर्फे खासदार प्रफुल पटेल आणि माजी आमदार राजेंद्र जैन यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *