Gondia police; जिल्ह्यातील १५४ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पदक जाहीर
गोंदिया : जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पोलिस महासंचालक कार्यालयाने त्यांना विशेष सेवा पदक जाहीर केले. ही यादी महासंचालक कार्यालयाने बुधवारी (दि.१३) जाहीर केली. यात जिल्ह्यातील १५४ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यासाठी ही गौरवाची बाब असून या कर्मचाऱ्यांना लवकरच हे पदक बहाल केले जाणार आहे. पोलिस महासंचालकाचे विशेष सेवा पदक जाहीर झालेल्यांमध्ये जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक ६, पोलिस सहायक पोलिस निरीक्षक २२, गुप्ता वार्ता विभागाचे दोन अधिकारी, पोलिस कर्मचारी ४९, गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील भारत बटालियनचे ५५ जवान, देवरी येथील विशेष पोलिस कॅम्पच्या २० कर्मचारी अशा एकूण १५४ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
पोलिस महासंचालक ५५ जवान भारत बटालियन बिरसी येथील जवान आहेत कर्मचारी यांच्या कार्याची कार्यालयातर्फे वर्षभर विशेष कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व दखल घेऊन त्यांना पोलिस महासंचालक विशेष सेवा पदक जाहीर केले जाते. स्वातंत्र्यदिनी हे पदक सन्मानपूर्वक संबंधितांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आहे. प्रथमच जिल्ह्यातील १५४ पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पदक जाहीर झाल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सर्व पदक प्राप्त पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे तसेच सर्व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
पोलिस निरीक्षक व सहायक पोलिस निरीक्षकांचा समावेश
विशेष सेवा पदक जाहीर झालेल्या पोलिस निरीक्षकांमध्ये दिनेश लबडे, अजय भुसारी, प्रवीण डांगे, पुरुषोत्तम अहेरकर, संदेश केंजळे, दीपक महाडिक, गुरुदेव खोब्रागडे यांचा समावेश आहे. तर सहायक पोलिस निरीक्षकांमध्ये विजय गराडे, राहुल पाटील, सुमेध खोपीकर, सुनील अंबुरे, राजू बस्तवाडे, मुकुंद जाधव, अंजोरी गंगाचूर, प्रमोद बांबोळे तर पोलिस उपनिरीक्षकांमध्ये वनिता सायकर, शरद सैदाने, माणिक गुट्टे, आकाश सरोदे, प्रियंका देसाई, भारत पांढरे, रामेश्वर ढाकणे, संतोष गुट्टे, अशोक खेडकर, नितीन इंगळे, युवराज अतकरे, प्रदीप शेलोटकर, विष्णू कुळमते, सचिन चरडे, बाबाराव राठोड, गजानन वैद्य यांचा समावेश आहे.

