Uncategorized

कर्णकर्कश आवाजात डीजे वाजविणाऱ्यांवर पोलिसांचा दणका; गोंदिया शहर व रामनगरात गुन्हे दाखल

कर्णकर्कश आवाजात डीजे वाजविणाऱ्यांवर पोलिसांचा दणका; गोंदिया शहर व रामनगरात गुन्हे दाखलध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार जणांवर कारवाई : गणेशोत्सवात नियमांचे पालन करण्याचे प्रशासनाचे आवाहन

Nगणेशोत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण राखण्यासाठी आणि नागरिकांना शांततेत सण साजरा करता यावा यासाठी पोलीस प्रशासनाने विनापरवाना व निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक कर्णकर्कश आवाजात डीजे वाजविणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. गोंदिया शहर आणि रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल करून एकूण चार जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.सविस्तर वृत्त असे की, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी शहरातील सर्व डीजे व लाऊडस्पीकर चालक तसेच मालकांची विशेष बैठक घेतली होती. या बैठकीत सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्यासह ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) कायद्याची सविस्तर माहिती देत कडक ताकीद देण्यात आली होती. तरीही या निर्देशांना केराची टोपली दाखवत शहरात अनेक ठिकाणी मोठ्या क्षमतेचे साउंड सिस्टीम लावून कानठळ्या बसवणारा आवाज केला जात असल्याचे समोर आले.चावडी चौक व टीबी टोली परिसरात कारवाईगोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चावडी चौक, छोटा गोंदिया येथे सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून मोठ्या क्षमतेच्या साउंड सिस्टीमद्वारे प्रचंड आवाजात डीजे वाजवला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिसांनी शास्त्री वॉर्ड येथील रहिवासी नंदकिशोर बुधराम राऊत (वय ३८) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.दुसऱ्या कारवाईत, रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्यानगर, टीबी टोली येथे सार्वजनिक जागेवर मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे लावून ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राकेश भाऊराव गजभिये (वय ४१, रा. छोटा गोंदिया), अंकित महेंद्र नागोसे (वय २०, रा. तुमखेडा) आणि हिरेश नंदलाल घारपिंडे (रा. गोविंदपूर) यांचा समावेश आहे.नियमांचे काटेकोर पालन करण्याचे पोलिसांचे आवाहनपोलीस प्रशासनाने सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, डीजे चालक आणि मालकांना स्पष्ट ताकीद दिली आहे की, न्यायालयाने ठरवून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचे व वेळेचे काटेकोर पालन करावे; अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. सदर कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रवीण बोरकुटे आणि रामनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी तिरुपती राणे यांच्यासह पोलीस पथकाने केली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *