Veterinary clinics : तीन महिन्यापासून पशुवैद्यकीय अधिकारीच नाही ?
बाराभाटी पशु दवाखानाची व्यथा : पशु पालकांची चिंता व मागणी
बाराभाटी (Arjuni-Mor) : स्थानिक ठिकाणच्या पशुवैद्यकीय दवाखाना (Veterinary clinics ) या ठिकाणी तीन महिन्यापासून पशुवैद्यकीय अधिकारी नाही. यामुळे पशु पालकांची चिंता वाढली आहे. या दवाखान्यात तातडीने पशुवैद्यकीय अधिकारींची मागणी केली आहे.
सदर दवाखाना बाराभाटी येथे पंचशील विद्यालयाच्या बाजूला तयार आहे. येथे फक्त एक कपांऊडर आहेत. ते सुद्धा दवाखान्यात नियमित उपस्थित राहत नाही. ते बाहेर जाऊन गावातील जनावरांचे उपचार करतात. पण दवाखाना हा मात्र बंद अवस्थेत आढळतो आहे. Veterinary clinics पशुपालक हे अनेक वेळा जाऊन चकरा मारतात. बंद असल्याने वाट पाहून परत घराकडे जातात. यामुळे पाळीव जनावरांचा योग्य उपचार होत नाही. याठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी आवश्यक आहे.
…………………………
जनावरांच्या औषधी उपलब्ध नाही
दवाखान्यात पशुपालक जनावरांचा उपचार करण्यासाठी गेले असता, कंपाऊडर हे म्हणतात औषधे नाही. बाहेरुन विकत घ्यावे लागतात. तर शासकीय दवाखान्यात ही समस्या आहे. पशुपालकांनी काय करावे?
……………………………………………………………..
तीन महिन्यापासून जनावरांचा डॉक्टर नाही. अनेक गुराखी व पशुपालक हे दवाखान्यातून परत येतात. उपचार होत नाही. याकडे कुणीच लक्ष देत नाही. उपचार न झाल्यास जनावर मृत्यू पडू शकतो.
_ अजिंक्य लोणारे, पशुपालक, येरंडी
……………………………………………………………..
जिल्हा परिषद प्रशासन झोपलेले…!
जिल्ह्यातील जिल्हा परिषद हे विभाग झोपलेले दिसते. परिसरात जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, सदस्य आहेत. पण काही कामाचे दिसत नाही. नागरिकांच्या समस्या सुटत नाही तेथे जनावराच्या समस्या कशा सुटणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

