LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

तावशी-संभाजीनगर महामार्गावर भरधाव वाहनाची धडक; चितळ जागीच ठार!

अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रातील घटना; वनविभागाकडून पंचनामा,

अर्जुनी मोरगाव (गोंदिया): वनक्षेत्रातून जाणाऱ्या तावशी-संभाजीनगर महामार्गावर रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका नर चितळाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना आज, रविवार १३ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास समोर आली. या घटनेमुळे महामार्गावरील भरधाव वाहतूक आणि वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अंदाजे ४ ते ५ वर्षे वयाचा हा नर चितळ जंगलातून रस्ता ओलांडून पलीकडे जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की चितळ रस्त्यावर फेकला जाऊन घटनास्थळीच गतप्राण झाला. महामार्गावर चितळ रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडल्याचे दिसताच वाटसरू व स्थानिक वन्यजीवप्रेमींनी हळहळ व्यक्त केली.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृत चितळाचा पंचनामा केला व नियमानुसार पुढील वनवैधानिक कारवाई सुरू केली. या भागात वन्यप्राण्यांची नेहमीच वर्दळ असल्याने वाहनचालकांनी वाहनाचा वेग नियंत्रित ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.अज्ञात वाहनाचा वनविभागाकडून शोध सुरूचितळाला धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा आणि चालकाचा वनविभाग कसून शोध घेत आहे. वनपरिक्षेत्राधिकारी बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक परशुरामकर, सतीश शेंदरे, रविंद्र सांतवार तसेच वनमजूर दिलीप डोंगरवार पुढील तपास करीत आहेत.संवेदनशील मार्गावर गतिरोधक व उपाययोजनांची मागणीवनक्षेत्रालगत असलेल्या रस्त्यांवरून वन्यप्राणी वारंवार रस्ता ओलांडत असतात. त्यामुळे अशा संवेदनशील वन्यजीव भ्रमण मार्गांवर वेग मर्यादा (Speed Limit) फलक, गतिरोधक, वन्यप्राणी मार्गाचे दिशादर्शक फलक आणि सावधतेच्या सूचना लावाव्यात, अशी आग्रही मागणी वन्यजीवप्रेमींकडून करण्यात येत आहे. विशेषतः सकाळच्या व रात्रीच्या वेळी वाहने सावकाश चालवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *