LatestNewsगोंदियाविदर्भ

भरधाव ट्रकने बोलेरोला चिरडले, ३ वर्षांच्या बालकासह ६ मजुर ठार

गोंदिया-बालाघाट महामार्गावर भीषण थरारपत्रे कापून मलब्यातून काढले मृतदेह; ७ मजूर गंभीर जखमी

गोंदिया : महाराष्ट्राला मध्य प्रदेशशी जोडणाºया गोंदिया-बालाघाट राज्य महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात घडला. नागरा गावाजवळ भरधाव व बेदरकारपणे येणाºया ट्रकने मजुरांनी भरलेल्या बोलेरो वाहनाला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत बोलेरोचा अक्षरश: चुराडा झाला. या भयानक अपघातात अवघ्या ३ वर्षांच्या निष्पाप बालकासह ६ मजुरांचा जागीच दुदैर्वी अंत झाला, तर ७ जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवार, ७ सप्टेंबरच्या मध्यरात्री दरम्यानची आहे. आरुष मात्रे (०३) रा.सावरी, किरण संतोष वैदे (२६) रा.लोडामी, संतोष मात्रे (३८) रा.किन्ही), सुशीला मात्रे (३५) रा.किन्ही), रूपसेन तेजलाल सत्यकर (३५) रा.निमदेवाडा आणि ज्योती रूपसेन सत्यकर (३२) रा. निमदेवाडा असे मृतांची नावे आहेत. मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर आणि लांजी परिसरातील शेतमजूर कुटुंबे आपल्या कुटूंबासह बोलेरो वाहन क्र.एमपी-१५/टी-३४९५ ने रोजगारासाठी तेलंगणातील हैदराबादकडे निघाले होते. रात्री ११:३० ते १२ वाजताच्या सुमारास वाहन नागरा गावाजवळ पोहोचले असता, समोरील दिशेने भरधाव वेगाने येणाºया ट्रक क्र.एमएच-३५/जे-२५४७ ने बोलेरोला थेट चिरडले. अपघाताचा कानठळ्या बसवणारा आवाज ऐकून महामार्गावरील प्रवासी आणि लगतच्या गावातील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच गोंदिया ग्रामीण पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. वाहनात आत अडकलेले मृतदेह व गंभीर जखमींना बाहेर काढण्यासाठी थेट गॅस कटर मागवून वाहनाचे पत्रे कापावे लागले. यानंतर जखमींना तातडीने गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी ६ जणांना मृत घोषित केले. तर जखमी मजुरांवर उपचार सुरू आहे. या प्रकरणी ट्रक चालक मोहसिन खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत..

…………………

जखमींवर उपचार सुरूअपघातात राजेंद्र शिवचरण पंधरे (३०) भूमेश्वर दुलीचंद मात्रे (३७), संगीता भूमेश्वर मात्रे (३५), संतोष चेतराम वैदे (३५), राकेश राजकुमार बाहे (२४), लक्ष्मी पंधरे (२७) आणि संदीप रूपलाल बाहे (३५) हे जखमी झाले असून उपचार घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम करीत आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *