LatestNewsबातमीमहाराष्ट्रविदर्भ

मोर्शी, चांदूर बाजार परिसरात दहशत पसरवणाऱ्या नरभक्षक वाघिणीचा अंत!

मोर्शी, चांदूर बाजार परिसरात दहशत पसरवणाऱ्या नरभक्षक वाघिणीचा अंत!३ जणांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला वनविभागाने केले ‘ट्रेन्क्यूलाईज’; नागपूरला नेताना वाटेतच मृत्यू

शिरजगाव कसबा: गेल्या आठवडाभरापासून मोर्शी, चांदूर बाजार आणि तिवसा तालुक्यांत धुमाकूळ घालून तब्बल तीन जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीला वनविभागाने सोमवारी यशस्वीरीत्या ‘ट्रेन्क्यूलाईज’ (बेहॉश) करून जेरबंद केले. मात्र, तिला पुढील उपचारासाठी नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात घेऊन जात असताना वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.सदर वाघीण गरोदर असण्याची शक्यता वर्तवली जात असून, तिच्या मृत्यूचे नेमके कारण बेशुद्धीच्या औषधाचा अतिवापर (ओव्हरडोज) आहे की इतर काही, याचा सखोल तपास वनविभागाकडून केला जात आहे.२०० मीटर ओढत नेऊन शेतकऱ्याचा घेतला बळीसोमवारी सकाळी वाघिणीने शिरजगाव कसबा येथील शेतकरी दिनेश शंकर आवारे (५२) यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की वाघिणीने त्यांना सुमारे २०० मीटर अंतरापर्यंत ओढत नेले, ज्यामध्ये त्यांचा शिरच्छेद होऊन जागीच मृत्यू झाला.यापूर्वी या वाघिणीने मोर्शीच्या भांबोरा गावातील एका शेतकऱ्याचा आणि रिद्धपूरजवळील सोनोरी येथील २२ वर्षीय उर्मिला या तरुणीचा बळी घेतला होता.अचूक निशाणा आणि ३ पथकांची धडाकेबाज मोहीमघटनेची माहिती मिळताच चंद्रपूर, नागपूर आणि अमरावती येथील वनविभागाच्या तीन पथकांनी तातडीने शिरजगाव गाठले. अमरावती आरआरयूचे वनपाल फिरोज खान यांनी अतिशय धैर्याने आणि अचूक निशाणा साधत वाघिणीवर डार्ट (बेशुद्धाचे इंजेक्शन) झाडले.त्यानंतर ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने शोध घेतला असता, घटनास्थळापासून १ किलोमीटर अंतरावर एका नाल्यात वाघीण बेशुद्ध अवस्थेत सापडली. वनविभागाने तिला तातडीने पिंजऱ्यात कैद करून ताब्यात घेतले.वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी घटनास्थळीघटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रादेशिक आमदार प्रवीण तायडे, माजी खासदार नवनीत राणा, सुरेखा ठाकरे आणि उत्कर्ष देशमुख यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नरभक्षक वाघीण पकडली गेल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असला तरी तिच्या मृत्यूमुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *