अंजोरा येथे भव्य शंकरपटाचा दिमाखात शुभारंभ
आमगाव (जि. गोंदिया): तालुक्यातील मौजा अंजोरा येथे आज, २३ मार्च २०२६ रोजी भव्य शंकरपटाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. या निमित्ताने आयोजित उद्घाटन सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमगाव पंचायत समितीचे उपसभापती माननीय नोहरलालजी चौधरी होते, तर उपाध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद गोंदियाच्या सदस्या माननीय सौ. वंदनाताई राजुभाऊ काळे उपस्थित होत्या.या भव्य शंकरपटाचे उद्घाटन तालुका काँग्रेस कमिटी आमगावचे अध्यक्ष माननीय संजयजी बहेकार यांच्या हस्ते करण्यात आले. सहउद्घाटक म्हणून प्रगती धान खरेदी केंद्र आमगावचे संचालक माननीय हेमंतजी फुंडे यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली, ज्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आमगावचे संचालक माननीय महेशभाऊ उके आणि जिल्हा काँग्रेस कमिटी गोंदियाचे सचिव राजुभाऊ काळे उपस्थित होते.

शंकरपटातील महत्त्वाचा मान असलेल्या सिग्नल पूजनाचा मान सामाजिक कार्यकर्ते माननीय भुमेश्वरजी मेंढे, माजी जिल्हा परिषद सदस्य जियालालजी पंधरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रामेश्वरजी श्यामकुंवर, सामाजिक कार्यकर्ते माननीय बलदेवजी चौधरी आणि सुभाषजी यावलकर यांनी भूषविला. तसेच पटदान पूजन माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय रमेशभाऊ बहेकार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिलीपजी टेंभरे, सामाजिक कार्यकर्ते माननीय अभयजी ढेंगे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय भुपेशजी अग्रवाल यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून रवीभाऊ ठाकरे, विनोदभाऊ ठाकरे, गजाननजी भांडारकर, संतोषजी गायधने, जयवंतजी बहेकार, अनिलजी परसमोडे, माधोरावजी काळसर्पे, लखनभाऊ रहांगडाले, अश्विनभाऊ तुरकर, गिरधारीजी रहिले, आनंदभाऊ भांडारकर (महाराष्ट्र पोलीस) यांची उपस्थिती लाभली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री कुर्रापाट बाबा शंकरपट समितीचे आयोजक बाळकृष्ण पटले, कमलेश बहेकार, सुनील मोटघरे, डॉ. दीपक पटले, राजेश मेश्राम, संतोष रहांगडाले, मोरेश्वर फुंडे, संजय कठाणे, संजय रहांगडाले, दिनेश भजे, साहेबलाल कटरे, किरण तुरकर, निखिल गोटे, नरेंद्र नेवारे, हंसराज गायधने व सर्व समिती सदस्य तसेच समस्त गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. या शंकरपटामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण असून मोठ्या संख्येने प्रेक्षक हजेरी लावत आहेत.

