Uncategorized

धोटे बंधु विज्ञान महाविद्यालयात प्राणिशास्त्र सोसायटी ‘FaunaSphere’ चे थाटात उद्घाटन

गोंदिया : गोंदिया एज्युकेशन सोसायटी संचालित धोटे बंधु विज्ञान महाविद्यालय, गोंदिया येथील प्राणिशास्त्र विभागात अत्यंत उत्साही आणि शैक्षणिक वातावरणात प्राणिशास्त्र सोसायटी ‘FaunaSphere’ चे शानदार उद्घाटन पार पडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज पटले यांच्या नेतृत्वाखाली व प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. गाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी ‘FaunaSphere’ च्या नव्याने गठित कार्यकारिणीची औपचारिक घोषणा करण्यात आली असून विभागप्रमुख डॉ. गाडेकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्राणिशास्त्र, जैवविविधता, वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या विषयांत आवड निर्माण व्हावी व त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नेतृत्वगुणांना वाव मिळावा, या उद्देशाने हे व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे.

‘FaunaSphere’ नवनिर्वाचित कार्यकारिणी:अध्यक्ष: कु. प्रतीक्षा वाहाने (बी.एस्सी. अंतिम वर्ष),उपाध्यक्ष: कु. दिव्या काटरे (बी.एस्सी. द्वितीय वर्ष),सचिव: कु. श्रेया बानसोड (बी.एस्सी. अंतिम वर्ष),सहसचिव: श्रेयश जागने (बी.एस्सी. प्रथम वर्ष),कोषाध्यक्ष: कु. दृष्टी महाजन (बी.एस्सी. अंतिम वर्ष),नवनियुक्त सदस्य:बी.एस्सी. अंतिम वर्ष: कु. रसिका चौधरी, कु. एकता जागने, कु. पलक ताम्रकार, कु. रिया सेंगर.,बी.एस्सी. द्वितीय वर्ष: कु. इशिता कमैया, कु. ईशा मिश्रा.,बी.एस्सी. प्रथम वर्ष: कु. धनश्री मेहता, कु. शिखा गुप्ता, कु. शालिनी मिश्रा, कु. श्रुती चावरे, कु. निकू बिसेन.या व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जैविक अभ्यासासोबतच वन्यजीव जनजागृती, पर्यावरणीय उपक्रम, क्षेत्राधारित (फील्ड) शिक्षण आणि वैज्ञानिक संवादात थेट सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रम प्रसंगी प्राणिशास्त्र विभागातील डॉ. सोनल वर्मा, डॉ. भरत भूषण बागेले आणि श्रीमती छायाताई सोनवणे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कार्यक्रम समन्वयक डॉ. शीतल जुनेजा बॅनर्जी यांनी केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने पार पडलेला हा सोहळा महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *