LatestNewsगोंदिया- भंडारा

नेपाळमध्ये ट्रेकिंगसाठी गेलेला साकोलीचा अतुल सुखरूप!

नेपाळमधील जलप्रलयात भारतीय पर्यटक अडकल्याच्या वृत्ताने कुटुंबीय चिंतेत; अखेर संपर्क झाल्याने जीव भांड्यात पडला
साकोली : गेल्या १५ दिवसांपूर्वी एका ग्रुपसोबत नेपाळमध्ये ट्रेकिंगसाठी गेलेला साकोली येथील अतुल रवींद्र झोडे हा युवक तिकडे सुखरूप असल्याची दिलासादायक वृत्त आहे.
नेपाळमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण जलप्रलयात भारतातील शेकडो पर्यटक अडकून पडल्याची व बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक सरकारकडून जाहीर करण्यात आली होती. यामुळे साकोली येथील रवींद्र झोडे यांच्या कुटुंबात प्रचंड चिंता लावून राहिली होती. दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांनी बुधवारीेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकल्याने वाढलेली काळजी अधिकच तीव्र झाली होती.
अखेर गुरुवारी २७ ऑगस्टला अतुलसोबत कुटुंबीयांचा संपर्क झाला. आपण तिकडे पूर्णपणे सुखरूप असल्याचे त्याने कळविल्यावर कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला.
कसा होता प्रवास?
अतुलने कुटुंबीयांना दिलेल्या माहितीनुसार, १५ दिवसांसाठी त्याचा ट्रेकिंग कॅम्प होता. यासाठी तो साकोलीतील एका मित्रासह गुरुवारी नागपूरवरून गोरखपूरला रवाना झाला. त्यानंतर रविवारी पोखरा येथे पोहोचला. नेपाळमधील अन्नपूर्णा पर्वतारांगांमध्ये त्याची ट्रेकिंग सुरू होती.
ज्या ठिकाणी महाप्रलय झाला, ते ठिकाण या पर्वतारांगांपासून बरेच दूर असल्याने महाप्रलयातून ते सुरक्षित राहिले. त्यामुळे ट्रेकिंग कॅम्पमधील सारेच सदस्य सुखरूप असल्याचे त्याने कळविले आहे. या महाप्रलयानंतर ट्रेकिंग थांबविण्यात आले असून सर्वजण खाली उतरत असल्याचे व तो सोमवारी परतणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *