LatestNewsगोंदियाविदर्भ

इर्रीच्या झुडपी जंगलात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर एलसीबीची धाड!

१२ जुगारी रंगेहाथ अटकेत; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
चारचाकी, दुचाकी, १४ मोबाईल व रोख रक्कम जप्त
तिघे पसार, अड्डा चालवणाऱ्या चौघांसह १९ जणांवर गुन्हा दाखल
गोंदिया :
गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा इर्री येथील झुडपी जंगलात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने मंगळवारी (२५ ऑगस्ट) रात्री उशिरा ११ वाजेच्या सुमारास धडक छापा टाकला. या कारवाईत ५२ पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळणाऱ्या १२ जुगाऱ्यांना पोलिसांनी रंगेहाथ बेड्या ठोकल्या, तर तिघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून चारचाकी वाहन, दुचाकी, १४ मोबाईल व रोख रकमेसह एकूण १२ लाख ४ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, इर्री गावशिवारातील झुडपी जंगलात मोठ्या प्रमाणावर पैशांची हारजीत लावून जुगार खेळवला जात होता. या माहितीच्या आधारे एलसीबीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून रात्रीच्या सुमारास जंगलात छापा टाकला. या प्रकरणी मोहीत दीपक साखरे (वय २८, रा. जब्बारटोला), नितेश राजू बागडे (वय २७, रा. बाजपेयी चौक, गोंदिया), दिनेश ऊर्फ राहुल राजकुमार चतुर्वेदी (वय १९, रा. सतनामी मोहल्ला, यादव चौक), डोहेल कमलकुमार बारे (वय २१, रा. सतनामी मोहल्ला, यादव चौक), मधुकर धनीराम गोंडाणे (वय ५१, रा. ठाणा, ता. आमगाव), शिवकुमार टेकलाल लिल्हारे (वय ४२, रा. न्यू लक्ष्मीनगर, गोंदिया), मुकेश भागवत भोंडेकर (वय ४२, रा. बघोली), विलास घनश्याम मानकर (वय २४, रा. गौतमनगर, गोंदिया), प्रलय सुभाष मेश्राम (वय ३५, रा. रतनारा), आकाश दिलीप भिमटे (वय ३२, रा. छोटा गोंदिया), विक्की राजू मस्करे (वय २७, रा. रतनारा) व आशिष सुखदेव उके (वय २९, रा. संजयनगर, गोविंदपूर, गोंदिया) यांना ताब्यात घेण्यात आले. तर पोलिसांची चाहूल लागताच निलेश उके (रा. गोंडीटोला, कुडवा), विवेक रहीले (रा. इर्री) आणि अभय विजय बारई (रा. यादव चौक) हे तिघे घटनास्थळावरून पळून गेले. ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या निर्देशानुसार एलसीबी पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात सपोनि अभिषेक जंगमवार, सपोनि अमरदीप खाडे, पोहवा संजय चव्हाण, दीक्षितकुमार दमाहे, विठ्ठलप्रसाद ठाकरे, सुबोध बिसेन, इंद्रजित बिसेन, भोजराज बहेकार, राजकुमार खोटेले, सोमेंद्रसिंह तुरकर, रियाज शेख, सुजित हलमारे, पोशि छगन विठ्ठले, हंसराज भांडारकर, राकेश इंदूरकर, चालक पोशि राम खंडारे व नीलेश ठाकरे यांनी केली.

१२ लाखांचा मुद्देमाल जप्त; अड्डा चालवणाऱ्या चौघांवरही गुन्हा
पोलिसांनी जुगाराच्या जागेवरून ६८,३०० रुपयांची रोख रक्कम, ८ लाख रुपये किमतीचे एक चारचाकी वाहन, ७० हजार रुपयांची एक मोटारसायकल, २ लाख ६१ हजार रुपयांचे १४ अँड्रॉइड मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १२,०४,५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीत हा जुगार अड्डा किसन रमेश दमाहे (रा. इर्री), मुकेश ऊर्फ बल्ला भगवानदास बिरिया (रा. मुरपार, रावणवाडी), सतीश तेजराम मेंढे (रा. सुपलीपार) आणि जितू मोहनसिंग पारासर (रा. संजयनगर, गोविंदपूर) हे चौघे मिळून चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी एलसीबीचे पोहवा संजय चव्हाण यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिसांत जुगार खेळणारे व खेळविणारे अशा एकूण १९ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *