elephants : गवर्रा, परसटोला, अंभोरा परिसरात हत्तीची दहशत
गजराजने आगमनाने उडविली खळबळ : शेतकरी पिकाच्या नुकसानीने चिंतीत
नवेगावबांध : गोठणगाव वनक्षेत्रात गेल्या सोमवारपासून (दि. २२ सप्टेंबर) वास्तव्य असलेल्या एका हत्तीने (गजराज ) elephants परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे.जांभळी, तुकूमनारायण, डोंगरगाव, उमरपायली या गावांच्या जंगलात फिरणाऱ्या या हत्तीचे लोकेशन शुक्रवारला (दि. २६) डोकीटोला परिसरात आढळले होते. काल, शनिवार (दि. २७) दिवसभर हत्ती elephants गवर्रा परिसरात होता,तर आज (रविवार) तो परसटोला व अंभोरा परिसरात असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद पवार यांनी सांगितले की, आज सकाळी गवर्रा येथील कक्ष क्रमांक २७० मध्ये हत्तीच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत, ज्यामुळे हत्तीच्या elephants वास्तव्याची पुष्टी झाली आहे. मागील वर्षीच्या जुलै महिन्यातही या भागात हत्ती आला होता आणि यंदाही त्याचे आगमन झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत.मुसळधार पावसामुळे आधीच धान पिकाचे नुकसान झाले आहे, त्यात आता हत्तीमुळे राहिलेले पीकही नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. वन विभागाकडून या हत्तीच्या elephants हालचालींवर सतत निगरानी ठेवली जात आहे. वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.वन विभागाने जांभळी, तुकुमनारायण, डोंगरगाव, उमरपायली, गवर्रा, परसटोला व अंभोरा येथील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद पवार यांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, हत्ती बिथरतील असे कोणतेही कृत्य करू नये, elephants हत्तीच्या जवळ जाऊ नये किंवा त्याला चिथावण्याचा प्रयत्न करू नये.शेतकरी बांधवांनी शेतात जाताना गटागटांमध्ये सावधपणे जावे, असे आवाहन वन विभागाद्वारे गावोगावी करण्यात आले आहे. या परिसरात २५ सप्टेंबरला बिबट्याने एका चिमुकलीचा बळी घेतल्यामुळे आणि त्यात मुसळधार पाऊस व आता हत्तीची दहशत यामुळे नागरिक व शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत.

