LatestNewsगोंदिया- भंडारा

तलावात बुडून विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

दीड वर्षांच्या चिमुकल्याने गमावली आई
देवरी :
तालुक्यातील फुक्कीमेटा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या हलबीटोला येथे जनावरे चारण्यासाठी गेलेल्या महिलेचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ६ ऑगस्टच्या सायंकाळ दरम्यानची आहे. रेखाबाई चोवाराम गुरुपंच (२१) असे मृतक महिलेचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे दीड वर्षांच्या चिमुकल्याचे मातृछत्र हरपले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सविस्तर असे की, रेखाबाई गुरुपंच या नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी जनावरे चारण्यासाठी गावाजवळील शिवारात गेल्या होत्या. सायंकाळी जनावरे घरी परतली; मात्र रेखाबाई घरी न आल्याने कुटुंबीयांनी गावकर्‍यांच्या मदतीने त्यांची शोधमोहीम सुरू केली. शोधाशोध सुरू असताना गावालगतच्या तलावात त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती सालेकसा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय देवरी येथे पाठवला. याप्रकरणी गुन्हा नोंद करून तपास सालेकसा पोलिस करीत आहेत. अवघ्या दीड वर्षाचे बाळाचे मातृछत्र हरपल्याने हलबीटोला गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *