LatestNewsगोंदियाविदर्भ

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार राजेंद्र जैन आक्रमक; गोंदियाच्या विकासकामांबाबत मांडल्या महत्त्वपूर्ण सूचना!

पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

गोंदिया : जिल्हाधिकारी कार्यालयात गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) महत्त्वपूर्ण बैठकीत खासदार राजेंद्र जैन यांनी गोंदिया शहरासह संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित विविध प्रलंबित विषयांवर प्रशासनाचे लक्ष वेधत रोखठोक सूचना मांडल्या.खासदार प्रफुल पटेल यांच्या विशेष प्रयत्नांतून गोंदिया (कुडवा) येथे मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल कॉलेज) निर्माणाधीन कामाच्या सद्यस्थितीचा आढावा खासदार राजेंद्र जैन यांनी घेतला. या महाविद्यालयाचे उर्वरित काम अत्यंत गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करून ते तातडीने पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.नागरिकांना दिलासा देण्यासाठी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करागोंदिया शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटार (Underground Drainage) योजनेच्या कामांमुळे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांची कमालीची दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहनधारक व नागरिक त्रस्त झाले असून, संबंधित विभागाने तात्काळ या रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी खासदार जैन यांनी बैठकीत केली.उड्डाणपूल, ऑडिटोरियम अन् तीर्थक्षेत्र विकासया बैठकीत खासदार राजेंद्र जैन यांनी खालील प्रमुख मागण्यांवर भर दिला:भीमनगर–कुंभारेनगर उड्डाणपूल: भीमनगर-कुंभारेनगर रेल्वे क्रॉसिंगवर प्रस्तावित अंडरपासऐवजी नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि भविष्यातील वाहतूक कोंडीचा विचार करून तेथे उड्डाणपूल (Flyover) उभारण्यात यावा.ऑडिटोरियम निधी: गोंदिया शहरासाठी प्रलंबित असलेल्या ऑडिटोरियमचा अतिरिक्त निधी मंजूर झाला असून, प्रशासकीय त्रुटी तात्काळ निकाली काढून कामाला गती द्यावी.तीर्थक्षेत्र विकास: परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर पवित्र अस्थी भीमघाट (गोंदिया), श्रीकृष्ण गौरक्षण गौशाला परिसर (पांजरापोल), गडमाता डुडुमाई देवस्थान (झालुटोला) व कोरणी घाट यासह जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक व पर्यटन स्थळांच्या विकासासाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करावा.जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व संबंधित विभागांनी आपापसांत समन्वय साधून सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी या बैठकीत व्यक्त केली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *