LatestNewsगोंदियाविदर्भ

आमदार विनोदजी अग्रवाल यांचे पुढाकाराने 200 क्षयरुग्णांना फूड बास्केटचे वितरण

गोंदिया :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंतीनिमित्त राज्यात दि.22ते 28 जुलै दरम्यान या कालावधीत राज्यभर विविध आरोग्य विषयक उपक्रम राबविण्याबाबत शासना मार्फत मार्गदर्शन सूचना प्राप्त झालेल्या आहेत.त्यानुसार आरोग्य संस्थेतील कार्यक्षेत्रात प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामपंचायत,जनआरोग्य समीती सभा अंतर्गत विविध समाजोपोयोगी उपक्रम त्यात आरोग्य तपासणी,रक्तदान शिबीरे,वृक्षारोपण करण्यात येत आहे.त्याचबरोबर प्रधानमंत्री टी.बी.मुक्त भारत अभियान अंतर्गत निक्षय मित्र बनून फूड बास्केटचे वितरण करण्यात येत आहे. दि.27 व 28 जुलै रोजी गोंदिया विधानसभा क्षेत्रातील आमदार विनोदजी अग्रवाल यांनी पुढाकार घेऊन गोंदिया तालुक्यातील 200 क्षयरुग्णाना फूड बास्केट वितरण करण्यात आले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार यांच्या मार्गदर्शनात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश जाधव यांच्या प्रत्यक्ष कार्यवाहीत गोंदिया तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र  येथील कार्यक्षेत्रातील 200 क्षयरुग्णाना फूड बास्केटचे वितरण करण्यात आले.त्याच बरोबर समाजातील इतर दानशूर व्यक्तींनी समोर येऊन निक्षय मित्र बनून गोरगरीब क्षयरोगी रुग्णांना मदतीचा हात देण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी गोंदियावासियांना केले आले.

क्षयरोगाच्या रुग्णांसाठी पौष्टिक ‘फूड बास्केट’ अतिशय महत्त्वाची असते. टीबीच्या औषधांमुळे रुग्णांची भूक मंदावते आणि शरीरातील ऊर्जा कमी होते.सकस आहारामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, औषधांचे दुष्परिणाम कमी होतात, वजन स्थिर राहते आणि रुग्ण लवकर बरा होत असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी दिली आहे.क्षयरोग रुग्णांच्या उपचारात आणि पुनर्प्राप्तीमध्ये ‘फूड बास्केट’ (पोषक आहाराचे किट) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.चांगला व सकस आहार आजाराशी लढण्याची रोगप्रतिकार शक्ती वाढवतो,औषधांचे दुष्परिणाम कमी करतो आणि रुग्णाचे वजन व ऊर्जा पूर्ववत करून त्याला लवकरात लवकर बरे होण्यास मदत करत असल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश जाधव यांनी याप्रसंगी माहीती दिली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *