LatestNewsगोंदियामहाराष्ट्रविदर्भ

नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या हस्ते वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियानाचा भव्य शुभारंभ

वृक्षधरा फाउंडेशनच वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन जनजागृती अभियान

नागपूर : पर्यावरण रक्षणाच्या दिशेने सातत्याने झपाट्याने काम करणाऱ्या वृक्षधरा फाउंडेशनच्या वतीने नागपूर येथे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन जनजागृती अभियानाचा भव्य शुभारंभ केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात गडकरी साहेबांनी स्वतः झाड लावून या अभियानाचा प्रारंभ केला आणि संपूर्ण फाउंडेशनच्या कार्याचे प्रामाणिक कौतुक करत सर्व स्वयंसेवकांना प्रेरणादायी मार्गदर्शन दिले.

गेल्या ८ वर्षांपासून वृक्षधरा फाउंडेशनने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये, गावांमध्ये, शाळांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी हजारो वृक्षांची लागवड केली आहे. फक्त रोपं लावणं नाही, तर ती जगवणं, त्यांची निगा राखणं, लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणं – हे संस्थेचे मूलभूत उद्दिष्ट राहिले आहे. या वर्षातही फाउंडेशनने संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षारोपणाच्या मोहिमा मोठ्या प्रमाणावर सुरू केल्या असून, या कामगिरीची दखल घेऊन ना.गडकरी यांनी स्वखर्चाने या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी झाड लावून उपस्थितांना संबोधित करताना सांगितले .“आज जे कार्य तुम्ही करता आहात, ते केवळ पर्यावरणासाठी नव्हे, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी आहे. झाडं लावणं ही सुरुवात आहे, पण ती जगवणं हेच खऱ्या अर्थाने वृक्षसंवर्धन आहे. हे कार्य निस्वार्थ आहे आणि त्यासाठी मी तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो.

”कार्यक्रमादरम्यान वृक्षधरा फाउंडेशनचे सहसंस्थापक नितेश बारेवार यांनी गोंदिया जिल्ह्यातील व इतर शाखांमधील वर्षभर अविरतपणे चालणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. शालेय बालकांपासून ते नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये पर्यावरण रक्षणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी संस्थेचे कार्यकर्ते अविरत प्रयत्न करतात, हे त्यांनी स्पष्ट केले.त्यावर प्रतिक्रिया देताना मा. गडकरी साहेब म्हणाले –“नितेश, तू आणि तुझी टीम हे कार्य न थांबता करत आहात, ही बाब खूप प्रेरणादायी आहे. फक्त झाडं लावून फोटो घेणे म्हणजे वृक्षारोपण नव्हे, ती झाडं जगतील याची जबाबदारी घेणं ही खरी सेवा आहे. भविष्यात तुम्हाला कोणत्याही मदतीची गरज भासल्यास मी तुमच्या पाठीशी सदैव आहे.” “या कार्यामागे राजकारण नाही, प्रसिद्धी नाही, केवळ एक ध्येय आहे – पर्यावरणाचं रक्षण आणि भावी पिढ्यांसाठी एक हिरवं भविष्य. अशा उपक्रमांमध्ये मी नेहमी सहभागी राहीन.”या कार्यक्रमाला कलार समाज, नागपूरचे माजी अध्यक्ष महेंद्रजी डोहरे, वृक्षधरा फाउंडेशनचे सहसंस्थापक भीम प्रजापती, विशाल हरिणखेडे, तनुज येडे, मंगेश चव्हाण, भूषण सोनटक्के, प्रतीक बिसेन, हिंगणा शाखेचे अध्यक्ष मनोज पिपरेवार आणि त्यांची संपूर्ण टीम, नागरा शाखेचे उपाध्यक्ष अजय दमाहे, गणप्रमुख अजय लिल्हारे आणि योगेश बारेवार, युवराज दियेवार, दिलीप डोहरे, प्रवीण तायवाडे कार्यक्रमाचा समारोप करताना गडकरी साहेबांनी वृक्षधरा फाउंडेशनच्या प्रत्येक स्वयंसेवकाला प्रोत्साहित करत सांगितले . कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवर आणि स्वयंसेवकांनी पुढील काळातही अधिक जोमाने आणि उत्साहाने झाडे लावण्याचा आणि जगवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *