LatestNewsगोंदियाविदर्भ

सावरी ट्रक चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; रावणवाडी पोलिसांकडून आणखी तिघे अटकेत!

३० टन तांदूळ विकून चोरट्यांनी लपवला होता ट्रक; मुख्य आरोपी आधीच पोलिसांच्या जाळ्यात

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील सावरी बस स्टॉप परिसरातून १७ जुलै रोजी भल्या पहाटे ४ वाजेच्या सुमारास झालेला चर्चित ट्रक चोरीचा कट उघडकीस आणण्यात रावणवाडी पोलिसांना मोठे यश आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी आधीच गजाआड केले होते. दरम्यान, या गुन्ह्यात सामील असलेले आणि फरार असणारे अन्य तीन आरोपी ३० जुलैच्या सकाळी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सावरी बस स्टॉपजवळ उभा असलेला ट्रक चोरून नेल्यानंतर आरोपींनी त्यामध्ये असलेला सुमारे ३० टन तांदूळ दुसऱ्या ठिकाणी विकला. यानंतर पकडले जाऊ नये म्हणून तो ट्रक एका अज्ञात ठिकाणी लपवून ठेवला होता. या संपूर्ण घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

रावणवाडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तांत्रिक तपास, गुप्त बातमीदारांचे जाळे आणि सातत्याने राबवलेल्या शोध मोहिमेच्या आधारे तिन्ही फरार आरोपींचा माग काढला. अखेर ३० जुलैच्या सकाळी पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून या तिन्ही फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार चोरीसह इतर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (गोंदिया) यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली पार पडली. रावणवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेवते आणि त्यांच्या पथकाने अत्यंत सूझबूझ आणि तत्परता दाखवत फरार आरोपींना बेड्या ठोकल्या असून या चर्चित ट्रक चोरी प्रकरणाचा यशस्वीरीत्या पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास रावणवाडी पोलीस करत आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *