LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

वर्ध्यात दारू पिऊन दुचाकी चालवणाऱ्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक: १३ दुचाकी जप्त!

जानेवारी ते जुलैदरम्यान २९३ ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस, ६४ जणांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव RTO कडे!
वर्धा:
मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवून इतरांचा आणि स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांवर वर्धा पोलिसांनी कारवाईचा मोठा बडगा उगारला आहे. जिल्हाभरात राबवण्यात आलेल्या विशेष धडक मोहिमेदरम्यान पोलिसांनी १३ मद्यधुंद दुचाकी चालकांवर गुन्हे दाखल करत त्यांच्या गाड्या जप्त केल्या आहेत. वाढत्या रस्ते अपघातांवर अंकुश लावण्यासाठी पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या कडक निर्देशानंतर ही धडक मोहीम राबवण्यात आली.

इतवारा चौकात नाकेबंदी; ‘ब्रेथ ॲनालायझर’ने पकडले तस्कर-तळीराम!
वाहतूक पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी करून ‘ब्रेथ ॲनालायझर’ उपकरणाद्वारे वाहनांची कडक तपासणी केली. यात इतवारा चौकात तपासणीदरम्यान खालील चालकांवर थेट गुन्हे दाखल करून गाड्या जप्त करण्यात आल्या:
उमाकांत निळकंठ त्रिपदवार (रा. हिंदनगर) – गाडी क्र. MH 32 M 0767
संजय सेवकराम राऊत (रा. राळेगाव) – गाडी क्र. MH 32 BB 0852
सुनील अजाबराव गेडामे (रा. पुलफैल) – गाडी क्र. MH 32 AB 7316
अनमोल शंकर चावरे (रा. सेवाग्राम) – गाडी क्र. MH 32 AU 1478
ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल तिवारी, मुकेश राऊत, शब्बीर सय्यद, संतोष राठोड, दिलीप कामडी, प्रदीप कोहळे यांच्या पथकाने पार पाडली.
🔴 ग्रामीण भागातही पोलिसांचा बडगा; ‘या’ तालुक्यांत गुन्हे दाखल
समुद्रपूर पोलीस ठाणे: राजेन्द्र विठ्ठल तांदुळकर (रा. नारायणपूर), सचिन किसना बारकिने (रा. आजदा), भारत निळकंठ जुगनाके (रा. समुद्रपूर), प्रशांत गजानन गर्देन (रा. बोथुडा किनगाव) आणि वैभव पंढरी रोकडे (रा. वडगाव) या पाच जणांवर कारवाई करण्यात आली.
पुलगाव व हिंगणघाट पोलीस ठाणे: निलेश शंकर घुनघुने (रा. गुंजखेडा), शेख रफिक शेख शमी (रा. इंदिरा गांधी वॉर्ड), शेख शहारूख शेख मेहमूद (रा. संत गोमाजी वॉर्ड) आणि बादल संजय तिमाडे (रा. वेळा) यांच्यावर कारवाई करून वाहने जप्त करण्यात आली.
७ महिन्यांत २९३ मद्यप्यांवर गुन्हे!
६४ परवाने रद्द होणार!
चालू वर्षात जानेवारी ते जुलै या अवघ्या सात महिन्यांत वर्धा जिल्हा पोलिसांनी मद्यपान करून दुचाकी चालवणाऱ्या तब्बल २९३ चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी गंभीर प्रकारातील ६४ चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे (RTO) पाठवण्यात आला आहे.
विना हेल्मेट ३,८८४ जणांवर दंडात्मक कारवाई!
अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांनी विना हेल्मेट फिरणाऱ्या ३,८८४ वाहनधारकांवर कारवाई केली आहे. तर बेकायदेशीर व नियमबाह्य प्रवाशी वाहतूक करणाऱ्या ११३ वाहनांवरही दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *