खासदार राजेंद्र जैन यांचा गोंदिया जिल्हा श्रमिक पत्रकार संघातर्फे नागरी सत्कार!
पत्रकार आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती : राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल भव्य सोहळा;
गोंदिया: गोंदिया जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने नवनिर्वाचित खासदार राजेन्द्र जैन यांच्या राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल एका विशेष ‘नागरी सत्कार समारंभा’चे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात आयोजक तसेच स्थानिक पत्रकारांच्या वतीने खासदार राजेंद्र जैन यांना पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मंचावर विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर आणि लोकप्रतिनिधी प्रमुख उपस्थित होते.

जनहिताचे प्रश्न संसदेत मांडणार: खासदार राजेंद्र जैनसत्काराला उत्तर देताना खासदार राजेंद्र जैन यांनी गोंदिया जिल्हा श्रमिक पत्रकार संघ आणि उपस्थित जनसमुदायाचे मनापासून आभार मानले. ते म्हणाले की, “हा सत्कार म्हणजे गोंदियातील जनतेचा आणि प्रसारमाध्यमांचा माझ्यावरील स्नेहाचा प्रतीक आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे आणि जनतेच्या हिताचे मुद्दे मी संसदेत पूर्ण निष्ठा व तत्परतेने मांडेन,” असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.मान्यवरांची उपस्थितीया सत्कार सोहळ्यास आमदार विनोद अग्रवाल, पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल व सर्व सदस्य, तसेच दिनेश दादरीवाल, रोशन जायसवाल, शिव शर्मा, नानु मदलियार, अशोक सहारे, रवी मुंदडा, राधेश्याम अग्रवाल, मन्नु गोयल यांच्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

