शिवकालीन युद्ध कला पाहून देवरीकर भारावले
विश्वमांगल्य सभेद्वारा आयोजन
देवरी – “शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप “शिवरायांचे दैदिप्यमान शौर्य साडेतीनशे वर्षानंतरही जनतेच्या मनामनात स्फूर्ती आहे. शिवरायांच्या याच रोमहर्षक व थरारक शस्त्र कलेची व युद्ध कलेची माहिती सर्वसामान्यांना व प्रामुख्याने तरुण व लहानग्यांना मिळावी .आणि ही कला पाहून त्यांनी स्वरक्षणाचे धडे घ्यावे या उद्देशाने विश्वमांगल्य सभा देवरी अंतर्गत विश्वमांगल्य गोंदिया भंडारा च्या प्रचारिका संगारताई चुंभाळकर आणि सविताताई पुराम यांच्या द्वारा आयोजित धुकेश्वरी मंदिर देवरी येथे दि.28 रोजी शिवकालीन युद्ध कला (तलवार गरबा), मैदानी खेळाचे आयोजन करण्यात आले. श्री. संत सावता माळी व्यायाम प्रसारक मंडळ व रणचंडी शिवकालीन युद्ध कला व आत्मसंरक्षण केंद्र वाशिम च्या 45 मुला – मुलींनी शिवकालीन युद्ध कला, व मैदानी खेळ,लाठीकाठी,तलवार गरबा खेळ दाखवून देवरीकरांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष संजू उईके, सभापती अनिल बिसेन, अँड.प्रशांत संगीडवार,पारस कटकवार, सविताताई पुराम, वैदही अंजनकर,अंजू बिसेन यांच्या हस्ते करण्यात आले.शिवकालीन मैदानी खेळ लाठी काठी, दांडपट्टा ,भाला, ढाल तलवारबाजी या पथकांकडून दाखविण्यात आली. विश्वमांगल्य सभा द्वारा देवरी, आमगाव, सालेकसा, तिरोडा या तालुक्यातील सात ठिकाणी या शिवकालीन युद्ध कलेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व ठिकाणी नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.”शिवकालीन खेळ शस्त्रास्त्र आणि गड किल्ले यांची माहिती व प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक असून काळाची गरज बनली आहे.”मन,मेंदू, आणि मनगट यांच्यामध्ये सहाच निर्माण करण्याच्या असेल तर मुला मुलींनी मैदानात उतरलेच पाहिजे शिवकालीन शस्त्रास्त्र खेळाचे प्रशिक्षण आपल्या मुलांना नेहमीच स्वरक्षणासाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्यातून आपली संस्कृती आणि संस्कार टिकून राहतील” असे यावेळी सविताताई पुराम म्हणाल्या.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गुरुवर्य अंबादास इंगोले, राजूभाऊ राऊत, केशव इंगोले, प्रवीण राऊत यांचे सहकार्य लाभले.

