आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण विभाग दोन्हीं पाळीत सूरू ठेवा
अधिकार सामाजिक संघटनेची प्रशासनाकडे मागणी
गोंदिया : ग्रामीण भागातील नागरीकांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी जी.प.अन्तर्गत चालविल्या जाणाऱ्या सर्वच रुग्णांलयातील बाह्यरुग्ण विभाग सकाळ संध्याकाळ अश्या दोन्ही पाळीत सूरू ठेवण्यात यावे अशी मागणी अधिकार सामाजिक संघटनेच्या वतीने सोमवारी (ता.18) जिल्हाधकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
ग्रामीण भागातील नागरीकांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात प्रार्थमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र , आयुर्वेदिक दवाखाने,ग्रामीण रुग्णालय चालविले जातात. या केंद्रातून फक्त सकाळ पळीतच बाह्यरुग्ण विभाग सुर ठेण्यात येतो. दुपार नंतर या रुग्णालयातील सर्व कर्मचारी शहराकडे पोबारा करीत असतात. मात्र सायंकाळीं किंवा रात्रीच्या दरम्यान जर नागरीकांना उपचाराची गरज भासली तर त्यांना वेळेवर उपचार मिळत नाही. परिणामी गरीब नागरीकांना महागड्या खाजगी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते. वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे अनेक नागरिकांना जीव गमवावे लागत आहे. असा आरोपही संघटनेने निवेदनातून लावला आहे.
ग्रामीण भागातील नागरीकांना चोवीस तास आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणुन शासनाने जिल्हा परिषदेच्या सर्व रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सकाळ संध्याकाळ अश्या दोन्ही पाळीत सूरू ठेवण्याची शक्ती ऐका परिपत्रकाद्वारे केली आहे. असे असतांनाही आरोग्य कर्मचारी फक्त सकाळ पाळीतच बाह्यरुग्ण विभाग सूरू ठेवतात हे निर्विवाद सत्य आहे. तसेच या विभागातील अनेक कर्मचारी मुख्यालयी न रहाता शहरातून कारभार हाकत असल्याचा प्रकारही संघटनेने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.मात्र वरिष्ठ अधिकारी या कर्मचाऱ्यावर कारवाही करतांना दिसत नाही.ग्रामीण भागातील नागरीकांची आरोग्याची सोय लक्षात घेता सकाळ संध्याकाळ अश्या दोन्ही पाळीत बाह्य रुग्ण सेवा उपलब्ध करून देण्यात यावी तसेच मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर करवाही करण्यात यावी अशी मागणी अधिकार सामाजिक संघटनेने जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. यावेळी संघटनेचे संयोजक आशिष नागपुरे, मनिष मेश्राम, देवेंद्र रामटेके,ओम पारधी, जाकीर खान, जमिल मिर्झा, विजय बोरकर, देवचंद बिसेन, शिवलाल नेवारे , सचिन डोंगरे, टेकचंद बिसेन, मुनेश्र्वर चिखलोंढे, देवेंद्र बिसेन, राजेंद्रसिंह राजकुमार प्रामुख्याने उपस्थित होते.

