निळ्या सागराचा महापूर! जिल्ह्यात भीम जयंतीचा जल्लोष
जयघोषात जिल्हा दुमदुमला; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन
गोंदिया (Gondia) : Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आज (ता.१४) मोठ्या उत्साहासह आदरभावात साजरी करण्यात आली आहे. दरम्यान शहरासह गावागावात शोभायात्रा, मिरवणूक काढून आंबेडकरी बांधवांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष केला. तसेच भिम गिताच्या तालावर आंबेडकरी बांधव चांगलेच धिरकले. एकच साहेब..बाबासाहेब’ अशा घोषणांनी जिल्ह्यातील आसमंत गरजले होते. तसेच निळ्या पाखरांनी आसमंत निळेभोर झाल्याचे पहावयास मिळाले.विशेष म्हणजे, जयंती उत्सव मागील दोन दिवसांपासून साजरा करण्यात येत आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आज (ता.१४) जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून सार्वजनिक उत्सव समिती तसेच आंबेडकरी बांधवाकडून तयारी केली जात होती. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 आदरांजली कार्यक्रमासाठी ठिकठिकाणी मंडप उभारण्यात आले होते. मागील दोन दिवसापासून जयंती महोत्सवाला सुरूवात झाली असून काल (ता.१३) रात्रीपासून संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमांसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे मध्यरात्रीला १२ वाजताच्या सुमारास आंबेडकरी बांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मोत्सव फटाक्यांच्या आतिषबाजीनेही साजरा केला.

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 आज (ता. १४) सकाळपासून शहरासह जिल्ह्यात हातात निळे झेंडे, पांढरे शुभ्र पोषाख, गळ्यात निळा रंगाचा दुपट्टा, निळी टोपी, फेटा अशा वेशभुषेत आंबेडकरी बांधव दिसून आले. सकाळी १० वाजतापासून गोंदिया शहरात जयंती कार्यक्रमाला सुरूवात झाली. जयंती निमित्त आंबेडकरी बांधवानी मोठी मिरवणूकही काढली. ढोलताशे, डिजेच्या तालावर महामानवाला आदरांजली देत भित गितांच्या निनादात लहानापासून ज्येष्ठापर्यंत आंबेडकरी बांधवत मग्न दिसून आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृतीला माल्यार्पण करीत अभिवादन करण्यासाठी जनसमुदाय उसळला होता.
………………………………………
डॉ.आंबेडकर चौकाला यात्रेचे स्वरूप
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनानिमित्त स्थानिक आंबेडकर चौकातील पूर्णाकृतीला अभिवादन करण्याकरीता शहरातील विविध भागातून आंबेडकरी बांधव मिरवणूकीसह दाखल झाले. सकाळपासून रात्री उशिरापर्यत Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 आंबेडकर चौकासह नेहरू चौक, जयस्तंभ चौक, गुरूनानक गेट, गांधी प्रतिमा, सुभाष गार्डन, नविन प्रशासकीय इमारत या सर्व भागांना यात्रेचे स्वरूप आले होते. जिकडे-तिकडे निळी टोपी, फेटे व पांढरे पोषाख परिधान करून आंबेडकरी महिला-पुरूष पहावयास मिळाले. गोंदिया शहरातील या मुख्य मार्गाला यात्रेचे स्वरूप आल्याने या मार्गावर रात्री ९ वाजेपासून वाहतुकही ठप्प पडली होती. विशेष म्हणजे, मोठा उड्डाणपूल ते जयस्तंभ चौक तसेच जयस्तंभ चौक ते गांधी प्रतिमा या मार्गावरील एकेरी वाहतूक वळविण्यात आली होती.
सामाजिक संघटनांचा पुढाकार
दरवर्षीप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव कार्यक्रम स्थानिक आंबेडकर चौकात आयोजित करण्यात आला होता. दरम्यान गोंदिया शहरातील कानाकोपर्यातून निघालेल्या शोभायात्रा, मिरवणूक ढोल-तास. डिजे, धुमाल आणि जय भिमच्या जयघोषात हजारोच्या संख्येत आंबेडकरी बांधव पोहोचले. जयंतीनिमित्त आंबेडकर चौकात आलेल्या आंबेडकरी बांधवांच्या सेवेसाठी शहरासह जिल्ह्यात समाजकार्य करणार्या संघटनांनी अल्पोहार, शरबत, फळ, पाणी, ताक आदिची सोय केली होती. यामध्ये अखिल भारतीय बौध्द महासभा, शिक्षक संघटना, मुस्लीम मॉयनारेंटी ट्रस्ट, समता सैनिक दल, समता परिषद आदिसह राजकीय पुढार्यांच्या समर्थकांनी स्टॉल लावून उत्सवात सहभागी झालेल्यांच्या सेवेत तैनात असल्याचे दिसून आले.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व भगवान महावीर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त शहरात कुठेही अप्रिय घटना घडू नये, यासाठी शहराच्या प्रत्येक मार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. शिवाय मिरवणुकीवरही पोलिसांची नजर होती.

