LatestNewsगोंदियागोंदिया- भंडाराविदर्भ

Sadak Arjuni : एस.चंद्रा महिला महाविद्यालयाची ग्रामीण रुग्णालयास शैक्षणिक भेट

आरोग्य सेवा व बायोवेस्ट मॅनेजमेंटचे घेतले प्रत्यक्ष ज्ञान
सडक अर्जुनी (Sadak Arjuni) :
स्थानिक एस. चंद्रा महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि घरगुती जीवशास्त्र (Household Biology) विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी ग्रामीण रुग्णालय, Sadak Arjuni सडक अर्जुनी येथे एका विशेष शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रीता खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. छाया लंजे यांच्या पुढाकाराने आयोजित या भेटीचा उद्देश विद्यार्थिनींना आरोग्य व्यवस्थेचे प्रत्यक्ष ज्ञान मिळवून देणे हा होता. मेडिकल सुप्रींटेन्डंट डॉ. तुरकर यांच्या परवानगीने आणि सिस्टर मेश्राम यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या भेटीदरम्यान विद्यार्थिनींनी रुग्णालयातील विविध विभागांना भेटी देऊन तेथील कार्यपद्धती, रुग्णांना मिळणाऱ्या सेवा आणि कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या सविस्तरपणे जाणून घेतल्या. सिस्टर मेश्राम यांनी रुग्णालयातील उपचार पद्धती, विविध तपासणी सेवा आणि आपत्कालीन सुविधांची माहिती दिली. विशेषतः ‘बायोवेस्ट मॅनेजमेंट’ (जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन) कसे केले जाते, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थिनींना दाखवण्यात आले. तसेच Sadak Arjuni रुग्णालयातील विविध अत्याधुनिक उपकरणांची कार्यपद्धती आणि त्यांच्या उपयोगाबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. या अनुभवामुळे विद्यार्थिनींच्या शैक्षणिक ज्ञानात मोलाची भर पडली आहे.
याप्रसंगी महाविद्यालयाचे एनएसएस विभाग प्रमुख डॉ. समीर महाजन, जितू खोटेले, नरेश लटये यांच्यासह तेजस्विनी उरकुडे, विद्या गावळ, तनुजा बनकर, जानवी पाथोडे, रोशनी गजबे, पलक राऊत, सानिया रामटेके, गौरी शेंडे, चाहत काटेंगे या विद्यार्थिनी आणि ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य व्यवस्थेचे प्रत्यक्ष संचलन समजून घेण्याच्या दृष्टीने ही भेट अत्यंत फलदायी ठरली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *