LatestNewsगोंदियामहाराष्ट्रविदर्भ

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, परिसरात भीतीचे सावट

गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आदर्श धाबेटेकडी येथे शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. घराजवळ खेळत असलेल्या सहा वर्षीय प्रज्वल गोवर्धन मेश्राम या चिमुकल्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करत त्याला ओढत जंगलाच्या दिशेने नेले. या भीषण घटनेत प्रज्वलचा दुर्दैवी मृत्यू झाला असून गावात शोककळा पसरली आहे.
सायंकाळी सुमारे ८:३० वाजताच्या सुमारास प्रज्वल घराजवळ खेळत असताना अचानक Leopard Attack बिबट्‌याने त्याच्यावर झडप घातली. कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने काही अंतरावर जाऊन प्रज्वलला सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. तत्काळ ग्रामस्थांनी एकत्र येत शोधमोहीम सुरू केली. काही वेळातच प्रज्वल गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
घटनेची माहिती मिळलाच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असूल परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. Leopard Attack ग्रामस्थांनी संबंधित बिबट्‌याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली आहे. “अशा घटना वारंवार घडत असल्याने प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे मानवी वस्तीला धोका निर्माण होत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दरम्यान, Leopard Attack वनविभागाकडून परिसरात पिंजरे लावणे, रात्री गस्त वाढवणे आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज असल्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. आदर्श धाबेटेकडी या जंगल परिसरात एका चिमुकल्या वर झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. चिमुकल्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकार बघला सदर हल्ला हा बिबट्यानेच केला असल्याची माहिती गोठणगाव चे वनपरिक्षेत्राधिकारी मिलिंद पवार यांनी दिली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *