LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्र

भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला भीषण अपघात

नागपूरजवळ ट्रकची धडक, थोडक्यात बचावले

नागपूर: भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला आज सकाळी नागपूर-भंडारा महामार्गावर भीषण अपघात झाला. सुदैवाने, या अपघातातून खासदार डॉ. पडोळे आणि त्यांचे सहकारी थोडक्यात बचावले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार डॉ. पडोळे आज सकाळी भंडारा येथून नागपूरच्या दिशेने रवाना झाले होते. संसदेच्या अधिवेशनासाठी त्यांना नागपूरवरून दिल्लीला जायचे होते. नागपूर जवळील वडोदा परिसरात, हल्दीराम कंपनीसमोर त्यांच्या वाहनाला एका भरधाव ट्रकने जोराची धडक दिली. धडक भीषण असली तरी एअरबॅग्समुळे मोठा अनर्थ टळला. धक्कादायक बाब म्हणजे, याच महामार्गावर खासदार डॉ. पडोळे यांच्यासोबत झालेला हा तिसरा अपघात आहे. या घटनेची माहिती मिळताच कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, खासदार सुरक्षित असल्याची माहिती मिळताच समर्थकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. पोलीस सध्या या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *